महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

DAY 1 BOX OFFICE COLLECTION : 'सत्य प्रेम की कथा' चित्रपटाने पहिल्या दिवशी केली बॉक्स ऑफिसवर रग्गड कमाई - बॉक्स ऑफिस

'सत्य प्रेम की कथा' या चित्रपटाने पहिल्या दिवशी फार चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षक फार पसंत करत आहे.

SATYA PREM KI KATHA
सत्य प्रेम की कथा

By

Published : Jun 30, 2023, 3:45 PM IST

मुंबई: 'सत्यप्रेम की कथा'ने देशांर्तगत बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे, बकरीदच्या सुट्टीने चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मदत झाली आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाने चांगले कलेक्शन केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 8.75 ते 9.75 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिस स्क्रीनवर खूप चांगली कामगिरी केली परंतु सिंगल स्क्रीनवर इतकी चांगली कामगिरी करू शकली नाही आहे.

'सत्यप्रेम की कथा' : हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची चांगली संख्या खेचण्यात यशस्वी ठरला आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीच्या शोमध्ये फार मोठ्या संख्याने प्रेक्षक बघायला आल्याने कलेक्शनमध्ये वाढ होऊ शकते. असा अंदाज व्यक्त केला जात आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली पकड निर्माण केली आहे. कार्तिक आर्यनच्या मागील 'शेहजादा' या चित्रपटापेक्षा या चित्रपटाने चांगली सुरुवात केली आहे. यासोबतच कार्तिकच्या इतर हिट चित्रपटांप्रमाणे या चित्रपटाची ओपनिंगही चांगली झाली आहे. कार्तिकच्या हिट चित्रपट 'लुक्का छुपी' 'सोनू के टीटू की स्वीटी', 'लव्ह आज कल 2' आणि 'पति पत्नी और वो' या चित्रपटांपेक्षा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट रूपेरी पडद्यावर कमाल करे हे निश्चित आहे, कारण पहिल्याच दिवशी या चित्रपटाचे रिव्ह्यू प्रेक्षकांनी सोशल मीडियावर चांगले दिले होते. तसेच काही एंटरटेनमेंट साईडवर देखील या चित्रपटाला 4.5 स्टार देण्यात आले होते. याशिवाय सुनिल शेट्टीने देखील चित्रपटाबद्दल प्रशंसा करत साजिद नाडियादवाला अभिनंदानाची एक पोस्ट टाकली होती.

चित्रपटाची स्टार कास्ट : 'सत्यप्रेम की कथा' हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे ज्यात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय गजराज राव, सुप्रिया पाठक, अनुराधा पटेल, राजपाल यादव, शिखा तलसानिया या कलाकारांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. तसेच हा चित्रपट प्रदर्शित झाल्याने आदिपुरूष आणि जरा हटके जरा बचकेच्या कमाईमध्ये घोका निर्माण झाला आहे .

हेही वाचा :

  1. naming ceremony : पाहा, राम चरण आणि उपासनाच्या मुलीच्या बारशाची जय्यत तयारी
  2. Ranbir Alia return Mumbai : दुबईच्या सुट्टीवरून मुंबईला परतले रणबीर कपूर आणि आलिया भट्ट, पहा त्यांची झलक
  3. Lust Stories 2 : लस्ट स्टोरीज 2 स्टार तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी शेअर केला त्यांच्या डेटिंग अनुभवाबद्दलचाा खुलासा

ABOUT THE AUTHOR

...view details