मुंबई- टॉलिवूड स्टार नानीचा पहिला पॅन इंडिया प्रोजेक्ट दसरा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे. रिलीज झाल्यापासून अवघ्या सहा दिवसांत दसरा चित्रपटाने 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. या चित्रपटाने जगभरात 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे, हा टप्पा गाठणारा नानीचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाने केवळ देशांतर्गत बाजारपेठेतच नव्हे तर परदेशातील बाजारपेठांमध्येही आपला ठसा उमटवला आहे, विशेषत: यूएसमध्ये जिथे तो दोन दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचण्याच्या जवळ आहे.
दसरा चित्रपटाची बॉलिवूड चित्रपटालाही टक्कर - नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अनेक बॉलीवूड चित्रपटांसाठीही दसरा हा कठीण स्पर्धा ठरला आहे. दसरा हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा अजय देवगणचा भोला हा चित्रपटही रिलीज झाला होता. त्यामुळे बॉलिवूडच्या भोलासोबत तगडी फाईट दसराने केली आहे. प्रेक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नानी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर कॅप्शनमध्ये लिहिले, 'आमचा एक प्रयत्न. तुमची भेट. दसरा चित्रपट जिंकला आहे. नानीच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, चाहत्यांनी कमेट सेक्शनमध्ये गर्दी केली आणि नानीच्या यशाबद्दल अभिनंदन केले. एका चाहत्याने लिहिले, 'या चित्रपटात तुमचे समर्पण स्पष्टपणे दिसले... 100 क्लबवर पोहोचल्याबद्दल अभिनंदन'. दुसर्याने लिहिले, 'अभिनंदन. हे पुरेसे नाही, हा चित्रपट याहून अधिक यशासाठी पात्र आहे...' आणखी एका युजरने लिहिले, नानी तुझा अभिमान वाटतो, तुझा अभिनय, वर्षाचा अॅक्शन, आणि डान्स, सर्वांत तू अजेय आहेस.'