मुंबई:ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' सिनेमा चित्रपटगृहामध्ये रिलीज होताच त्याच्या टोपोरी डायलॉग्स आणि खराब व्हीएफएक्समुळे मोठा वादात सापडला होता. यानंतर अनेक सेलिब्रिटींनीही यावर आपले मत व्यक्त केले, विशेषत: रामानंद सागर यांच्या रामायणमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल, सुनील लाहिरी आणि दीपिका चिखलिया यांनी आदिपुरुषवर दिलेल्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता नुकतेच रामायणात हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या दारा सिंह यांचा मुलगा विंदू दारा सिंग यानेही यावर भाष्य केले आहे.
'आदिपुरुष' वादग्रस्त चित्रपट : रामानंद सागर यांच्या लोकप्रिय शो 'रामायण'मध्ये विंदूचे वडील दिवंगत दारा सिंह यांनी हनुमानजींची भूमिका साकारली होती. तसेच आता 'आदिपुरुष' वादाच्या पार्श्वभूमीवर, विंदू दारा सिंग म्हटले की, 'हा चित्रपट रामायणात काम करणाऱ्या पात्रांचा वारसा बदलण्याचा प्रयत्न करतो'.'हनुमानजी हे सामर्थ्यवान होते आणि ते नेहमी हसत असत. पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याला (देवदत्त नागे)ला हिंदीत नीट बोलताही येत नाही, त्याला दिलेल्या संवादांला त्याने काहीतरी वेगळेच केले आहे. कदाचित त्यांनी मार्वल चित्रपट पाहणाऱ्या तरुण पिढीला लक्षीत केले असावे. पुढे त्याने म्हटले, 'भविष्यात रामायण कोण स्वीकारेल याची त्याला पर्वा नाही, माझा विश्वास आहे की कोणीही माझ्या वडिलांच्या वारशात अडथळा आणू शकत नाही किंवा त्यांनी पडद्यावर जे काही केले आहे त्याच्या जवळही कोणी येऊ शकत नाही. त्यांनी आपल्या व्यक्तिरेखेने इतिहास रचला आहे आणि हे आदिपुरुषाचे पात्र त्यांच्या आसपासही नाही.