मुंबई - अभिनेता राघव जुयालला सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटामधील त्याच्या भूमिकेसाठी 1.2 कोटी रुपये मानधन मिळाले होते. या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. डान्स इंडिया डान्स 3 या रिअॅलिटी शोमध्ये दिसल्यानंतर प्रसिद्धीस आलेला डान्सर अभिनेता राघव जुयाल, सलमान खानच्या किसी का भाई किसी की जानमध्ये दिसला. या चित्रपटात राघवने कौटुंबिक मनोरंजन करणाऱ्या इश्कची भूमिका साकारली होती.
राघव जुयालचे मानधन - त्याच्या जवळच्या एका व्यक्तीने सांगितले की, 'किसी का भाई किसी की जान' मधील भूमिकेसाठी राघवला 1.2 कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. तरुणांमध्ये त्याची असलेली लोकप्रियता आणि डिजिटल प्रेक्षकांशी त्याच्या उत्तम नातेसंबंधामुळे हे घडले. सोशल मीडियावरील लोकप्रिय नाव आणि रिअॅलिटी शो स्पर्धक ते रिअॅलिटी शो होस्ट आणि आता अभिनेता असा राघव जुयालचा बराच यशस्वी संघर्षाचा प्रवास होता.
किंग ऑफ स्लो मोशन - एक डान्सर -कोरियोग्राफर आणि आता अभिनेता बनलेल्या राघवची प्रसिद्धी ही त्याची स्लो-मोशन डान्स मूव्ह्ससाठी खास करुन होती. त्याला किंग ऑफ स्लो मोशन या टोपणनावनेही ओळखले जात असे. 'किसी का भाई ...' चित्रपटात राघवने सलमानने साकारलेल्या पात्राच्या धाकट्या भावाची भूमिका साकारली आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटाव्यतिरिक्त, राघव लवकरच गुनीत मोंगाच्या प्रॉडक्शन हाऊसच्या दोन चित्रपटांमध्ये आणि एक्सेल एंटरटेनमेंटसाठी सिद्धांत चतुर्वेदीसोबत चित्रपटामध्ये दिसणार आहे.