मुंबई :गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेब सीरिजमुळे तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्ट्री केली आहे. सोनाक्षी सिन्हाच्या 'दहाड' या वेब सीरिजला स्ट्रीमिंग पदार्पणासाठी खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या वेब सीरिजमध्ये ती एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे, या वेब सीरिजची कहाणी अशी आहे की, अंजली भाटी ही व्यक्तीरेखा खालच्या जातीतून येते आणि तिला लहानपणापासून भेदभावाचा सामना करावा लागतो. ही कहाणी फार प्रेरीत करणारी आहे. या वेब सीरिजबद्दल सोनाक्षीने म्हटले, 'माझा आवडता सीन तो आहे जिथे आपण आनंदच्या वडिलांच्या घरी छापा टाकायला जातो आणि तो अंजलीला आत येऊ देत नाही कारण तो म्हणतो की ती खालच्या जातीची आहे, तो असे करू देणार नाही. ज्या प्रकारे तो सीन लिहिण्यात आला आहे, हा संवाद फार मनाला भिडणारा आहे. ते खरोखरच हादरून देणारे होते. एक अभिनेत्री म्हणून मला त्या ओळी बोलता येणे आणि स्वतःसाठी उभे राहणे खरोखरच सशक्त होते.'
दहाड वेब सीरिज :ती पुढे म्हणाली, 'मला हे डायलॉग बोलताना ताकद जाणवत होती. ज्यात म्हटले होते की हा पूर्वजांचा वेळ नाही, कायदा-कानून आणि संविधानाचा वेळ आहे. कायद्यानुसार आणि संविधानानुसार गोष्टींचा न्याय आणि निर्णय घेतला जातो. आणि एक पोलीस म्हणून मला तुमच्या घरात जाण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे. आणि जर तुम्ही मला थांबवण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्यावर केस करेल. त्यामुळे मला असे वाटते की ते खरोखरच खूप शक्तिशाली शब्द लिहिले होते आणि लेखकांनी एक विलक्षण काम केले आहे. एक अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी, ते सादर करणे अत्यंत खास होते.'