नवी दिल्ली - Cricket world cup 2023 : क्रिकेट विश्वचषक 2023 मधील सामने जसजसे पार पडत आहेत तसतशी स्पर्धेतली रंगत वाढायला लागली आहे. क्रिकेट चाहत्यांचा उत्साहही दिवसेंदिवस वाढत चाललाय. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सोमवारी खेळला गेलेला विश्वचषकातील सामना अफगाणिस्तानने 8 गडी राखून जिंकला. अफगाणिस्तानने या स्पर्धेत दुसरा मोठा धक्का दिला. यापूर्वी अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडचा पराभव केला आणि आता पाकिस्तानचा पराभव केला. अफगाणिस्तानकडून झालेल्या या पराभवानंतर पाकिस्तानचा उपांत्य फेरीतील मार्ग थोडा कठीण झाला आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानने या विजयासह उपांत्य फेरीच्या शर्यतीत आपलं स्थान कायम राखलंय. या सामन्यानंतर पॉइंट टेबलमध्ये काय बदल झाले ते जाणून घेऊयात.
पॉइंट टेबलवर एक नजर:
वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय संघाने सर्व 5 सामने जिंकून 10 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे. न्यूझीलंड 5 पैकी 4 सामने जिंकून 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असलेल्या आफ्रिकेने 4 पैकी 3 सामने जिंकले आणि 6 गुण मिळवले. आज जर आफ्रिकेने हा सामना जिंकल्यास गुणतालिकेत दुसरे स्थान गाठू शकेल. त्याचवेळी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, बांग्लादेश प्रत्येकी चार गुणांसह अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. गतविजेता इंग्लंड या गुणतक्त्यात सर्वात खालच्या स्थानावर आहे. या संघाने आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला आहे.
आतापर्यंत सर्वाधिक धावा:
भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरलाय. त्यानं 5 सामन्यात 354 धावा केल्यात. विराट कोहली न्यूझीलंडविरुद्ध 95 धावांची इनिंग केल्यानंत त्याला हे अव्वल स्थान मिळालं आहे. त्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने पाच सामन्यांत 311 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान असून त्याच्या नावावर आतापर्यंत 302 धावा आहेत. न्यूझीलंडचे फलंदाज रचिन रवींद्र (290) आणि डॅरिल मिशेल (268) चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.
विश्वचषक 2023 मध्ये सर्वाधिक विकेट्स: