महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

विनयभंग प्रकरणी नवाजुद्दीन व कुटुंबाला कोर्टाने दिली क्लीन चिट - नवाजुद्दीन सिद्दीकी विनयभंग प्रकरण

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबातील चार जणांना विनयभंग प्रकरणात न्यायालयाने क्लीन चिट दिली आहे.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी

By

Published : Apr 28, 2022, 5:03 PM IST

मुझफ्फरनगर : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबातील चार जणांना विनयभंग प्रकरणात न्यायालयाने क्लीन चिट दिली आहे. विशेष POCSO (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स) न्यायालयाचे न्यायाधीश संजीव कुमार तिवारी यांनी बुधवारी पोलिसांना क्लोजर रिपोर्ट सादर करून तक्रारदाराला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने नवाजुद्दीन, त्याचे भाऊ मिनाजुद्दीन, फयाजुद्दीन, अयाजुद्दीन आणि त्याची आई मेहरुनिसा यांना क्लीन चिट दिली आहे.

फिर्यादीनुसार, मिनाझुद्दीनने 2012 मध्ये कुटुंबातील एका अल्पवयीन सदस्याचा विनयभंग केला होता व तर इतरांनी त्याला पाठिंबा दिला होता. मुंबईच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आणि नंतर मुझफ्फरनगर येथील बुढाणा पोलीस ठाण्यात हलवण्यात आला. न्यायालयाच्या निर्देशानुसार, पोलिसांनी तक्रारदाराला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे, असे मंडल अधिकारी पोलीस उपअधीक्षक विनय गौतम यांनी वृत्त संस्थेला सांगितले.

हेही वाचा -Maxwell Wedding Function : वेडिंग फंक्शनमध्ये 'ऊं अंटावा' गाण्यावर विराटने धरला ठेका; अनुष्का शर्माने शेअर केले फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details