मुंबई - Vikrant Masseys 12th Fail : अभिनेता विक्रांत मॅसीची मुख्य भूमिका असलेला '12th Fail' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर त्याला बॉक्स ऑफिसवर थंड प्रतिसाद मिळाला. मात्र चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक सकारात्मक बोलू लागले. समीक्षकांनीही चित्रपटाचे भरभरुन कौतुक केलं. चित्रपटाबद्दल जेव्हा प्रेक्षक चांगलं बोलू लागतात तेव्हा त्याचा उत्तम परिणाम होतो हे या चित्रपटानं पुन्हा सिद्ध करुन दाखवलं. चाहत्यांनी विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित '12th Fail' चित्रपटाची प्रशंसा केल्यानंतर, दीपिका पदुकोणदेखील स्तुतीसुमने उधळणाऱ्यांमध्ये सामील झाली आहे. हा उत्कृष्ट चित्रपट निर्माण केल्याबद्दल तिनं टीमचं कौतुक केलं.
'12th Fail' चित्रपटाबद्दल आतापर्यंत अनेक लोकांनी प्रतिक्रिया देत आवडल्याचं म्हटलं होतं. यामध्ये सामान्य प्रेक्षकांपासून ते फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गजांचा समावेश होता. यामध्ये कमल हसन, ऋषभ शेट्टी, संजय दत्त, आलिया भट्ट, फरहान अख्तर, हृतिक रोशन, अनुराग कश्यप, कंगना रणौत, रोहित शेट्टी आणि अनिल कपूर आदींनी या चित्रपटाचे कौतुक केलं आहे.
बायोग्राफिकल ड्रामा फिल्म '12th Fail' २७ ऑक्टोबर २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाली. सुरुवातीला या चित्रपटाकडे फारसे लक्ष यश मिळाले नसले तरी मिळत असलेला प्रतिसाद खूपच दिलासा देणारा होता. विशेष म्हणजे या चित्रपटावर टीका करणारा अपवादानेही सापडत नव्हता. त्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रसारित व्हायला सुरुवात झाली आणि घरोघरी या चित्रपटाचे जोरदार स्वागत झालं. दीपिका पदुकोण देखील चित्रपटातील संपूर्ण कलाकार आणि क्रू पाहून प्रभावित झाली होती. त्यांना तिच्या शुभेच्छा देताना दीपिकाने सोशल मीडियावर आलिया भट्टची प्रतिक्रिया रीपोस्ट केली आणि लिहिले, "मला याहून अधिक काही म्हणायचे नाही. सर्व कलाकार आणि क्रूचे अभिनंदन."