हैदराबाद- शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित 'जवान' या चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. मीडियानुसार, 'जवान' चित्रपटात शाहरुख खानशी दोन हात करण्यासाठी खलनायकाच्या भूमिकेत दमदार अभिनेता विजय सेतुपतीची एन्ट्री झाली असल्याची पुष्टी झाली आहे. विशेष म्हणजे विजय या महिन्याच्या अखेरीस चेन्नईमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. हा चित्रपट 2 जून 2023 रोजी प्रदर्शित होत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट एका दमदार खलनायकाच्या शोधात असल्याची चर्चा पूर्वीपासून होती आणि चित्रपटाचे दिग्दर्शक अरुण कुमार उर्फ ऍटली यांचा हा शोध विजयच्या नावावर संपला आहे.
गेल्या काही दिवसांपासून या भूमिकेसाठी विजय सेतुपतीचे नाव पुढे येत असल्याची चर्चा होती. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानसमोर आता विक्रम-वेधा स्टार विजय झगडताना दिसणार आहे. विजय पहिल्यांदाच शाहरुख खानसोबत काम करणार आहे.