महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

विनोदी कलाकारांचा गुच्छ असलेला 'भिरकीट' उडवणार हास्याचा धमाका! - भिरकीट दिग्दर्शक अनुप जगदाळे

विनोदी कलाकारांचा गुच्छ असलेला 'भिरकीट' हास्याचा धमाका उडवणार हे नक्की. याचे दिग्दर्शन अनुप जगदाळे यांनी केले असून चित्रपटाची कथा त्यांचीच आहे. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मोनालिसा बागल, कुशल बद्रिके, सागर कारंडे, सैराट फेम तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद यांच्या प्रमुख भूमिका आहे.

विनोदी मराठी चित्रपट भिरकीट
विनोदी मराठी चित्रपट भिरकीट

By

Published : May 18, 2022, 4:30 PM IST

मुंबई- विनोदाचे बादशहा एकत्र आल्यावर किती मोठा हास्याचा धमाका होईल याची कल्पना करून बघा. विनोदी कलाकारांचा गुच्छ असलेला 'भिरकीट' हास्याचा धमाका उडवणार हे नक्की. क्लासिक एंटरप्राईज प्रस्तुत, सुरेश जामतराज ओसवाल आणि भाग्यवंती ओसवाल निर्मित 'भिरकीट' चे दिग्दर्शन अनुप जगदाळे यांनी केले असून चित्रपटाची कथा त्यांचीच आहे. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मोनालिसा बागल, कुशल बद्रिके, सागर कारंडे, सैराट फेम तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद यांच्या प्रमुख भूमिका आहे.

‘भिरकीट'ची पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे असून हा एक जबरदस्त विनोदी चित्रपट आहे. पोस्टरमध्ये सगळेच विनोदवीर एकत्र दिसत असून हा चित्रपट विनोदाचा धमाका उडवणार हे नक्की. सध्यातरी चित्रपट कोणत्या विषयावर आधारित आहे, याचा अंदाज येत नसला तरी 'भिरकीट' प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणार आहे. चित्रपटाचे छायाचित्रण तनवीर मिर यांनी केले असून संकलन फैजल महाडिक यांचे आहे. तर शैल-प्रितेश या हिंदी जोडीचे 'भिरकीट'ला संगीत लाभले आहे.

विनोदी मराठी चित्रपट भिरकीट

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणाले, ''या चित्रपटाची जेव्हा घोषणा करण्यात आली तेव्हाच अनेकांनी 'भिरकीट' म्हणजे नक्की काय असे विचारले होते. प्रेक्षकांच्या मनातही प्रश्न आहे नक्की काय विषय आहे हा? तर हळूहळू 'भिरकीट' म्हणजे काय हे प्रेक्षकांना कळू लागेल. सध्या एकंच सांगू शकेन की हा चित्रपट एक डार्क कॉमेडी सिनेमा आहे. चित्रपटात इतके दमदार कलाकार आहेत. सगळेच विनोदाचे बादशाह आहेत. त्यामुळे तुफान धमाल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.''

युएफओने ‘भिरकीट' या चित्रपटाच्या वितरणाची धुरा सांभाळली आहे. जबरदस्त कलाकारांची फळी असलेला हा चित्रपट येत्या १७ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा -मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णीचा ३४ वा वाढदिवस

ABOUT THE AUTHOR

...view details