मुंबई- प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधनाचे दु:ख अजून संपले नव्हते तोच मनोरंजन जगतातून आणखी एक धक्कादायक वाईट बातमी समोर आली आहे. राजू श्रीवास्तव यांच्यासोबत 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या कॉमेडी शोमध्ये कॉमेडी करणारे कॉमेडीयन पराग कंसारा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल यांनी सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे ही दुःखद बातमी शेअर केली आहे.
कॉमेडियन सुनील पाल यांनी दिली दु:खद बातमी - सुनील पाल यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, कॉमेडी जगतातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आमचे सहकारी पराग कंसारा राहिले नाहीत. नुकतेच राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर आता परागबाबत ही दुःखद बातमी समोर आली आहे.
पराग कंसारा यांचा प्रवास - कॉमेडियन पराग कंसारा गुजरातच्या वडोदरा येथील रहिवासी होता. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या लोकप्रिय कॉमेडी शोच्या पहिल्या सीझनमध्ये तो स्पर्धक म्हणून दिसला होता. परागची विनोदी शैली खूप आवडली. कॉमेडी शोमध्ये तो कधीही विजेता ठरला नसला तरी त्याने आपल्या कॉमेडीने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली. पराग कंसाराही अनेक कॉमेडी शोमध्ये कॉमेडी करताना दिसला आहे.