मुंबई- अॅक्शनपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'सर्कस' चित्रपटाचा ट्रेलर आज शुक्रवार 2 डिसेंबर रोजी रिलीज झाला आहे. चार दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा एक मजेशीर टीझर प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये चित्रपटाच्या अर्ध्याहून अधिक स्टारकास्टचा खुलासा करण्यात आला होता. टीझरसोबतच चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज होणार याचीही माहिती देण्यात आली होती. रणवीर सिंग, पूजा हेगडे आणि जॅकलीन फर्नांडिस या स्टार्सनी सजलेला हा कॉमेडी-ड्रामा चित्रपट २३ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.
ट्रेलर कसा आहे? - 'सर्कस' चित्रपटाचा 3.38 मिनिटांचा ट्रेलर धमाल मस्तीने भरलेला आहे. संपूर्ण ट्रेलरमध्ये रणवीर सिंगची दुहेरी भूमिका सर्वच पात्रांशी भन्नट वागताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये ६० च्या दशकातील दृश्ये पाहायला मिळत आहे. ट्रेलरमध्ये कलाकारांची एवढी गर्दी पाहायला मिळत आहे. संपूर्ण ट्रेलरमध्ये पार्श्वभूमीत 'करंट लगा' हे गाणे वाजत आहे आणि शेवटी दीपिका पदुकोणची एन्ट्री तिच्या चाहत्यांना भुरळ घालणार आहे. होय, रोहित दिग्दर्शित सर्कस या चित्रपटात दीपिका पदुकोणही दिसणार आहे.