महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Harish Magon passed away : गोलमाल, नमक हलाल फेम अभिनेता हरीश मगन यांचे निधन - Cine TV Artist Harish Magon

'गोलमाल' आणि 'नमक हलाल'मध्ये दमदार भूमिका साकारणारे चरित्र अभिनेता हरीश मगन आणि हरीश मगन यांचे निधन झाले आहे. सिने टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Harish Magon passed away
अभिनेता हरीश मगन यांचे निधन

By

Published : Jul 3, 2023, 12:18 PM IST

मुंबई - हिंदी चित्रपटांचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेता आणि अनेक चित्रपटांमध्ये विविध मनोरंजक भूमिका साकारणारे हरीश मगन यांचे निधन झाले आहे. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये व्यक्तिरेखा साकारणाऱ्या या कलाकाराने वयाच्या ७६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या मागे पत्नी पूजा, मुलगा सिद्धार्थ आणि मुलगी आरुषी असा परिवार आहे.

त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना सिने टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने सांगितले की, ते एक उत्तम कलाकार होते आणि ते नेहमीच चित्रपट आणि सिने जगताला समर्पित होते. त्यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून अभिनयाची तालीम देऊन अनेक कलाकारांना चित्रपट जगतासाठी तयार केले.

हरीश मगन यांचा जन्म ६ डिसेंबर १९४६ रोजी झाला होता. पुण्याच्या FTII संस्थेतून पदवी घेतल्यानंतर त्यांनी अनेक हिंदी फीचर फिल्म्समध्ये संस्मरणीय भूमिका साकारल्या. त्यांनी छोट्या भूमिकातूनही आपल्या अभिनय क्षमतेची अमिच छाप सोडलेली असे. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'नमक हलाल', 'चुपके चुपके', 'मुकद्दर का सिकंदर', 'शहेनशाह' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय 'खुशबू', 'इंकार', 'गोलमाल' अजूबा, यांसारख्या चित्रपटांमध्येही त्याने भूमिका साकारल्या होत्या. 1997 मध्ये आलेल्या 'उफ्फ ये मोहब्बत' या चित्रपटात त्यांनी शेवटचे काम केले होते.

हरीश मगन हे मुंबईतील जुही भागात एक अ‍ॅक्टिंग स्कूल चालवत होते. हरीश मगन अ‍ॅक्टिंग इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्याबरोबरच त्यांनी रोशन तनेजा अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये प्रशिक्षक म्हणूनही काम केले. अभिनयातले अनेक बारकावे ते सहअभिनय शिकवत असत. एपटीआयआयमध्ये प्रशिक्षण घेतले असल्यामुळे आणि अनेक चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये त्यांना खूप मान सन्मान होता. त्यांनी अभिनयाचे प्रशिक्षण दिलेले अनेक कलाकार आज चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात आपले नाव कमावत आहेत. आज हरीश मगन यांच्या निधनानंतर बॉलिवूडसह टीव्ही क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर अनेक कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details