महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'लुट पुट गया' गाण्यावर थिरकला ख्रिस गिल, शाहरुख खाननं केलं त्याच्या कोरिओग्राफीचं कौतुक - Chris Gill danced on the song Lutt Putt Gaya

Chris Gill danced on Lutt Putt Gaya : 'डंकी' चित्रपटातील लुट पुट गया या गाण्यावर अनेकजण रील्स बनवत आहेत. बॉलिवूड गाण्यांचा फॅन असलेल्या वेस्ट इंडिजचा क्रिकेटर ख्रिस गिलनेही या गाण्यावर एका मुलीसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ बनवला आहे. त्याचे हे रील शाहरुख खानला आवडलं असून हा व्हिडिओ 'किंग खान'ने शेअर केला आहे.

Chris Gill danced on the song Lutt Putt Gaya
'लुट पुट गया' गाण्यावर थिरकला ख्रिस गिल

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2023, 10:47 AM IST

Updated : Dec 15, 2023, 11:58 AM IST

मुंबई - Chris Gill danced on Lutt Putt Gaya : सुपरस्टार शाहरुख खान त्याच्या आगामी 'डंकी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे. अलीकडेच निर्मात्यांनी चित्रपटातील तीन गाणी रिलीज केली आणि चाहत्यांच्या पसंतीस ही गाणी उतरल्याचं दिलतंय. या गाण्यावर अनेक रील बनवली जात आहेत. अलीकडेच वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेलने 'डंकी' चित्रपटातील 'लट पुट गया' गाणे कोरिओग्राफ केलं आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. खुद्द 'किंग खान'नेही या क्रिकेटरच्या कोरिओग्राफीचे कौतुक केलं आहे. या तडाखेबंद स्टार क्रिकेटरचा व्हिडिओ शेअर करून त्यावर शाहरुखने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

X वर ख्रिस गिलचा व्हिडिओ शेअर करताना, शाहरुख खानने लिहिलं, "आणि युनिव्हर्स बॉसने पार्कच्या बाहेर हिट मारली आहे, अगदी त्याच्या लौकिकाला साजेशी. थँक यू माय मॅन. आपण एकवेळ भेटूयात आणि लुट पुट गयावर एकत्र डान्स करुयात." डंकीतील मूळ गाण्याची कोरिओग्राफीही खूपच अतरंगी स्वरुपाची आहे. गणेश आचार्यनं या गाण्याच्या स्टेप्स कल्पकतेनं कोरिओग्राफ केल्या. या गाण्यावर शाहरुखनं कमालीचा परफॉर्मन्स दिला. या स्टेप्स लोकांच्या कायम स्मरणात राहतील. त्यामुळे जगभर लोक या गाण्यावर रील्स बनवत आहे.

ख्रिस गिलचा हा व्हिडिओ शाहरुख खान युनिव्हर्स फॅन क्लब पेजने शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये क्रिकेटर एका मुलीसोबत 'लुट पुट गया'वर डान्स करताना दिसत आहे. त्याच्या भारतीय चाहत्यांना हा डान्स खूप आवडला आहे.

शाहरुख खानसाठी हे वर्ष खूप छान गेलं. कोविडनंतरच्या काळात त्यानं पठाण आणि जवानसोबत मोठ्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री केली आहे. त्याच्या दोन्ही चित्रपटांनी जगभरात 1000 कोटींहून अधिक कमाई करत विक्रम रचले. या चित्रपटातील गाणी, अ‍ॅक्शन्स आणि खुर्चीला खिळवून ठेवणारं कथानक यामुळे त्याला यशाला गवसणी घालता आली. आता 'किंग खान' राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'डंकी' चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. या चित्रपटात तो पहिल्यांदा तापसी पन्नूसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटात विकी कौशलचाही कॅमिओ रोलमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Last Updated : Dec 15, 2023, 11:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details