महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Vicky Kaushal : 'कतरिना कैफ शिवाय कोण आवडतं' प्रश्नावर विकी कौशलचं मिश्किल उत्तर - फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ

Vicky Kaushal : अभिनेता विकी कौशल लवकरच मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादूर'मध्ये दिसणार आहे.अलिकडेच त्यानं त्याला भारतीय सैन्याच्या 6 शीख रेजिमेंटला भेट दिली. त्यावेळी एक सैनिकानं त्याला त्याची पत्नी कतरिना कैफ शिवाय दुसरी कोणती अभिनेत्री आवडते असे विचारलं असता त्यानं मजेशीर उत्तर दिलं.

Vicky Kaushal
विकी कौशलचं मिश्किल उत्तर

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2023, 3:06 PM IST

मुंबई - Vicky Kaushal : मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादूर' या चित्रपटात अभिनेता विकी कौशलनं भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विकी जीवाचं रान करतोय. अलीकडेच दिल्ली भेटीदरम्यान त्याला भारतीय सैन्याच्या 6 शीख रेजिमेंटला भेट देण्याची संधी मिळाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत त्याला 'पत्नी विकी कौशल शिवाय दुसरी कोणती अभिनेत्री आवडते', असा प्रश्न विचारण्यात आला असता तो विनोदी ढंगात उत्तर देताना दिसला.

विकीनं वरील प्रश्नाचं उत्तर पंजाबीमध्ये दिलं. तो म्हणाला, "भाऊ, एका उत्तरामुळं मला माझ्या घरात कोणताही वाद निर्माण करायचा नाही. मला इतर अभिनेत्री दिसत नाहीत, फक्त एकच दिसते. माझं ध्येय सैन्याच्या मिशनसारखं एकच आहे."

प्रश्न विचारणाऱ्या त्या सैनिकाला विकी म्हणाला की मला आवडणाऱ्या पुरुष अभिनेत्याबद्दल तो विचारु शकतो. याविषयी विचारले असता विकीनं अमिताभ बच्चन यांचं नाव घेतलं. बच्चन यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असल्याचं तो म्हणाला.

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्यातील प्रेम प्रकरण चित्रपट निर्मात्या झोया अख्तरच्या पार्टीत झालेली भेटीनंतर सुरू झालं. पापाराझींनी त्यांना पहिल्यांदा 2019 मध्ये एका दिवाळी पार्टीत एकत्र पाहिलं होतं. त्यानंतर त्यांच्या रोमान्सच्या चर्चांना उधाण आलं. विकी आणि कतरिनाने डिसेंबर 2021 मध्ये शाही लग्न पार पडेपर्यंत आपलं नातं गुलदस्त्यात ठेवलं होतं.

दरम्यान, बायोग्राफिकल युद्धपट असलेला 'सॅम बहादूर' हा चित्रपट भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. यात मुख्य भूमिकेत विकी कौशल असून फातिमा सना शेखनं इंदिरा गांधींची भूमिका केली आहे आणि सान्या मल्होत्राने सॅम माणेकशॉची पत्नी सिलूची भूमिका साकारली आहे. राझी या यशस्वी चित्रपटानंतर विकी कौशलचा दिग्दर्शिका मेघना गुलजारसोबतचा हा दुसरा चित्रपट आहे. 'सॅम बहादूर' 1 डिसेंबर 2023 रोजी जगभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

हेही वाचा -

  1. Papa Meri Jaan: 'अनिमल'च्या नव्या गाण्यात रणबीर आणि अनिल कपूरमध्ये दिसलं पिता पुत्राचं नातं

2.54th Iffi: मायकेल डग्लस ठरणार 'इफ्फी'चं मुख्य आकर्षण, आंतरराष्ट्रीय फिल्म्ससाठी गोवा सज्ज

3.Ar Rahman Faces Backlash : एआर रहमानचं गाणं वादाच्या भोवऱ्यात, 'पिप्पा'च्या निर्मात्यांनी मागितली माफी

ABOUT THE AUTHOR

...view details