महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

The Broken News season 2 : द ब्रोकन न्यूज सीझन २ चा टीझर रिलीज, माध्यमांचे पितळ उघडं पाडणारा थ्रिलर - श्रिया पिळगावकर

द ब्रोकन न्यूज या आगामी थ्रिलर मालिकेच्या सीझन 2 चा टीझर बुधवारी निर्मात्यांनी रिलीज केला. या मालिकेत सोनाली बेंद्रे आणि जयदीप अहलावत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

The Broken News season 2
द ब्रोकन न्यूज सीझन २

By

Published : Jun 8, 2023, 12:28 PM IST

मुंबई - द ब्रोकन न्यूज गाजलेल्या वेब सिरीजचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. थ्रिलर मालिका असलेल्या मालिका द ब्रोकन न्यूज सीझन 2 च्या निर्मात्यांनी अधिकृत टीझरचे लॉन्चिंग केले आहे. झी ५ या ओटीटीवर ही मालिका लवकरच सुरु होणार असल्याचे निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर प्रेक्षकांना सांगितले.

विनय वायकुल यांनी दिग्दर्शित केलेली ब्रोकन न्यूज ही मालिका न्यूज रिपोर्टिंगच्या जगावर आधारित आहे आणि त्यात श्रिया पिळगावकर आणि अक्षय ओबेरॉय यांच्याही मुख्य भूमिका आहेत. नवीन सीझनच्या अधिकृत प्रसारणाच्या तारखेची अद्याप वाट पाहावी लागणार आहे. निर्मात्यांनी अधिकृत टीझरचे लॉन्चिंग केल्यानंतर लगेच, चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद देत लाल हृदय आणि फायरचा भडिमार केला आहे.

द ब्रोकन न्यूज या शोबद्दल बोलताना, श्रिया पिळगावकरने आधी सांगितले की, 'द ब्रोकन न्यूजच्या सीझन 1 साठी आम्हाला मिळालेल्या प्रेमाबद्दल मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे. देशातील न्यज चॅन्ल्स दैनिदन बातम्या मिळवताना कोणते सायास करतात याचा शोध घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. ही एक अनेक धक्कादायक वळणे असलेली रोमांचक आणि आकर्षक कथा आहे. आमच्या लेखन टीमने सीझन 2 मध्ये शोधलेल्या वेगवेगळ्या थीम आणि गोष्टी चकित करणाऱ्या आहेत.' श्रिया पिळगावकरने या मालिकेत साकारलेल्या राधा या पत्रकारितेच्या भूमिकेसाठी अनेक नामांकने आणि प्रशंसा मिळवली आहेत.

आपण साकारलेल्या भूमिकेविषय बोलताना श्रिया म्हणाली, 'माझे पात्र राधा पुन्हा धमाकेदारपणे परतले आहे आणि तिच्यावर चुकीचा आरोप करणार्‍या व्यवस्थेशी लढा देण्याच्या ती मिशनवर आहे. या सीझनमध्ये पुढे काय करणार आहे याबद्दल ती खूप अनभिज्ञ आहे. एक कलाकार म्हणून ही भूमिका साकारणे माझ्यासाठी अधिक मनोरंजक आहे. जयदीप आणि सोनाली हे प्रिय मित्र आहेत आणि मी त्यांच्यासोबत सेटवर परत येण्यास उत्सुक आहे. यामध्ये काही आश्चर्यकारक गोष्टी आहेत आणि मी त्याबद्दल आत्ताच बोलू शकत नाही, पण मी सीझन 2 बद्दल खरोखरच उत्तम काम केले आहे.'

ABOUT THE AUTHOR

...view details