मुंबई -अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. 20 एप्रिल 2007 रोजी या दोघा लव्हबर्ड्सने लग्नगाठ बांधली होती. या खास दिवसाची आठवण करून देताना, बुधवारी रात्री ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी आपापल्या इन्स्टाग्राम त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो शेअर केले.
क्लोज-अप इमेजमध्ये अभिषेक ऐश्वर्याचा हात धरून तिच्या बोटात अंगठी घालत आहे. मात्र फोटोत या जोडप्याचे चेहरे दिसत नाहीत. पोस्ट शेअर करताना, ऐश्वर्या रायने स्पार्कल्स, लाल हृदय, तीन हृदयांसह एक हसरा चेहरा, इंद्रधनुष्य आणि रिबनसह एक इमोजींचा समूह टाकला आहे.
अभिषेकने कोणतेही कॅप्शन न लिहिता फोटो पोस्ट केला आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाच्या दिवसाच्या फोटोला नेटिझन्सकडून खूप प्रेम मिळालं आहे. यात फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सहकाऱ्याचाही समावेश आहे.
अभिषेकचे वडील आणि मेगास्टार अमिताभ बच्चन यांनीही प्रतिक्रिया देताना प्रेम एकजुटीने राहते, असे म्हटलंय. "ऐश्वर्या आणि अभिषेक तुम्हाला 15 वर्षे पूर्ण झाल्याच्या शुभेच्छा!!! सर्वोत्तम गोष्टी अजून घडायच्या बाकी आहेत,," असे अभिनेत्री निम्रत कौरने लिहिले आहे.