महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

CBFC member reacts : द केरळ स्टोरी बंदीवर सीबीएफसी सदस्य वाणी त्रिपाठी यांची पश्चिम बंगाल सरकारवर टीका - प्रोड्यूसर्स गिल्डनेही केला निषेध

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या सदस्य वाणी त्रिपाठी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, पश्चिम बंगाल सरकार द केरळ स्टोरीवर बंदी घालण्याचा निर्णय घेऊ शकत नाही. चित्रपटाचा निर्णय घेणे आणि त्याचे मूल्यांकन करणे हे लोकांवर अवलंबून आहे.

CBFC member reacts
द केरळ स्टोरी बंदीवर

By

Published : May 10, 2023, 1:08 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आणि सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) सदस्य वाणी त्रिपाठी यांनी पश्चिम बंगाल राज्याने द केरळ स्टोरीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकारला प्रतिक्रिया दिली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वाणी यांनी सांगितले की, चित्रपटाचा निर्णय घेणे आणि त्याचे मूल्यांकन करणे हे प्रेक्षकांवर अवलंबून आहे. ही कारवाई 'अलोकतांत्रिक' असल्याचेही त्यांनी म्हटलंय.

पश्चिम बंगालमध्ये द केरळ स्टोरीवर बंदी - द्वेष आणि हिंसाचाराची कोणतीही घटना टाळण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अलीकडेच राज्यात चित्रपटाच्या प्रदर्शनावर तात्काळ बंदी घालण्याची घोषणा केली. सुदीप्तो सेन यांनी दिग्दर्शित केलेल्या द केरळ स्टोरी चित्रपटामध्ये ISIS या दहशतवादी गटाने केरळमधील महिलांची कशी भरती केली आणि त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले याची गोष्ट दाखवली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना वाणी म्हणाल्या, 'तुम्ही प्रेक्षकांचा लोकशाही हक्क हिरावून घेत आहात. चित्रपटाचे भवितव्य ठरवण्याचा अधिकार प्रेक्षकांना आहे. तुम्ही किंवा मी या चित्रपटाचा निर्णय घेऊ शकत नाही, निर्माताही ठरवू शकत नाही. चित्रपट त्यांना पटतो की नाही हे प्रेक्षक ठरवतील आणि त्यांच्यात व निर्मात्यांमध्ये एक पुल निर्माण होईल.' वाणी त्रिपाठी पुढे म्हणाल्या, 'प्रत्येक चित्रपट अश्रूमय असावा असे नाही, असे चित्रपट आहेत जे गडद आहेत. अखेरीस, आम्ही फक्त एका चित्रपटाला प्रमाणित करू शकतो आणि या देशात लोकशाही प्रमाणीकरणाची ती एकमेव भरीव प्रक्रिया आहे. जर त्याचाही त्रास होत असेल तर फक्त देवच वाचवू शकतो.'

प्रोड्यूसर्स गिल्डनेही केला निषेध - अलीकडेच, प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाने द केरळ स्टोरीवरील बंदीचा निषेध केला. तामिळनाडूमधील मल्टिप्लेक्सने कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्या आणि लोकांकडून मिळालेल्या खराब प्रतिसादाचा उल्लेख करत रविवारी चित्रपटाचे प्रदर्शन रद्द केले. 5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटावरून राजकीय वादाला तोंड फुटले आहे. विपुल अमृतलाल शाह यांच्या सनशाइन पिक्चर्स निर्मित, या चित्रपटात अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे.

हेही वाचा -Adipurush : आदिपुरुषांसाठी प्रभासने घेतली कठोर मेहनत

ABOUT THE AUTHOR

...view details