फ्रान्स : कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी आपली हजेरी लावली. सर्व बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी आपल्या सौदर्यांचे प्रदर्शन या कार्यक्रमात दाखविले, तर मग यामध्ये माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन ही कशी मागे राहणार आहे. या कार्यक्रमात तिने सोफी कॉउचर या लेबलवरून एक आकर्षक हुड असलेला गाऊन परिधान केला होता. दरवर्षीप्रमाणे माजी मिस वर्ल्डने कान्सच्या रेड कार्पेटवर आपल्या सौदर्यांचे प्रदर्शन केले आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिचे ग्लॅम लूक ठेवत, ऐश्वर्याने गुरुवारी कान फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये ग्लिट्ज आणि ग्लॅमचा परिपूर्ण गोष्टी सोबत ठेवल्या होत्या.
ऐश्वर्याचे लूक: पोनियिन सेल्वन अभिनेत्री आणि ऐश्वर्या राय कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये तिच्या उपस्थितीने सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. ऐश्वर्या राय बच्चनने क्लासिक काळ्या रंगाचा गाऊन आणि साडी सारख खाली सोडले होते याशिवाय तिने या गाऊनमध्ये सिल्व्हर रंगाचे फ्रिल असून तिची हूड देखील सिल्व्हर रंगाची होती. सोफी कौचर यांनी डिझाइन केलेले हे पोशाख अॅल्युमिनियम पॅलेट आणि क्रिस्टल्सपासून बनवले आहे. डोके झाकण्यासाठी डिझायनरने एक छान हुड जोडले आहे. मेकअपबद्दल बोलायचे झाले तर ऐश्वर्या राय बच्चनने मेकअपमध्ये फारसे प्रयोग केले नाहीत. तसेच तिने फ्री हेअरस्टाइल केली होती शिवाय ओठांना तिने लाल रंगाची लिपस्टीक लावली होती. तसेच तिने काळ्या रंगाची आयलाइनर लावले होते. तिने स्टेटमेंट एन्सेम्बल रिंगसह तिचा लूक पूर्ण केला होता. या लूकमध्ये ऐश्वर्या ही फार सुंदर दिसत होती.