मुंबई - बॉलिवूड प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या किंग खान शाहरुखने ( Actor Shah Rukh Khan ) कॅनडाच्या कॉन्सुल जनरल डायड्रा केली ( Canada consul general Diedrah Kelly ) यांनाही प्रभावित केले आहे. अलीकडेच त्याच्या मुंबईतील मन्नत या बंगल्यामध्ये ( Mumbai home Mannat ) शाहरुखने कॅनडाच्या कॉन्सुल जनरल यांना ( Canada consul general ) आमंत्रीत केले व त्यांचा यथोच्च पाहुणचार केला होता.
"किंग खान शाहरुखचे जगभरातील (जागतिक इमोजी) प्रेक्षकांवर असलेले आकर्षण मला समजले आहे. शुक्रिया शाहरुख आणि गौरी खान, तुम्ही केलेल्या माझ्या हार्दिक स्वागतासाठी धन्यवाद. मी बॉलिवूड आणि बॉलीवूडमधील संबंध आणखी मजबूत करण्यासाठी आणि नवीन सह-उत्पादन संधींसाठी उत्सुक आहे. कॅनडा फिल्म इंडस्ट्री," असे डायड्रा केली यांनी लिहिले आहे.
मुंबईतील फ्रान्सचे कॉन्सुल जनरल जीन-मार्क सेरे-शार्लेट यांनीही शाहरुखसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.