मुंबई - Buy One Get One Free Ticket for Jawan :शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती स्टारर चित्रपट 'जवान' चित्रपटगृहांमध्ये चांगलं यश मिळवत आहे. किंग खानच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अॅटली कुमार दिग्दर्शित हा चित्रपट प्रदर्शित होऊन 22 दिवस झाले आहेत. या चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 550 कोटींहून अधिक कमाई केली आहे आणि आता 'जवान' 600 कोटींचा टप्पा पार करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. 'जवान'नं वर्ल्डवाइड 1000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 'जवान' जगभरातील हिंदी चित्रपटातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. 'जवान' हा शाहरुख खानच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
'जवान'च्या तिकीटांवर ऑफर : दरम्यान आता 'जवान' चित्रपटाच्या कमाईत घट होत आहे. त्यामुळं प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यासाठी निर्मात्यांनी तिकिटांवर ऑफर जाहीर केली. इंस्टाग्रामवर रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या पोस्टमध्ये त्यांनी असं लिहलं की, डबल धमाका सिंगल किंमत. हा चित्रपट पाहण्यासाठी कोणीही तुमच्यासोबत जाऊ शकते. एक तिकीट खरेदी केल्यावर, दुसरे तिकीट पूर्णपणे फ्री आहे. 1 + 1 ऑफर.' उद्यापासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये तुमच्या प्रियजनांसोबत जवानांचा आनंद घ्या.' अशी पोस्ट करण्यात आली आहे. तसेच किंग खान देखील 'जवान' चित्रपटाच्या तिकिटांवर ऑफर जाहीर केली आहे. त्यानं आपल्या पोस्टमध्ये लिहलं, आंटी, आई-काकू...म्हणजे संपूर्ण कुटुंब आणि प्रत्येकासाठी एक मोफत तिकीट. तर उद्यापासून कुटुंब, मित्र आणि तुमच्या प्रेमासाठी फक्त एक तिकीट खरेदी करा आणि दुसरे मोफत मिळवा. 'संपूर्ण कुटुंबासह विनामूल्य मनोरंजनाचा आनंद घ्या,' अशी घोषणा केली आहे.