मुंबई- चित्रपट निर्माता अयान मुखर्जीचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट ( Ayan Mukerjis ambitious project ) ब्रह्मास्त्र ९ सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर दाखल झाला. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ( Ranbir Kapoor and Alia Bhatt ) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने धमाकेदार सुरुवात केली आहे. ब्रह्मास्त्रने सुट्टीच्या दिवशी रिलीज होऊन सुमारे 35-36 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह RRR ओपनिंग डे नंबरला मागे टाकले.
ब्रह्मास्त्रला उत्तम रिव्ह्यू मिळाले नाहीत पण पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कामगिरी केली असे दिसते. जगभरात ८,९१३ स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट (भारतात ५,०१९ स्क्रीन, ३,८९४+ परदेशात) प्रदर्शित झाला आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने 36.50 ते 38.50 कोटी कमावले आहेत.
ट्रेड वेबसाइट BoxOfficeIndia.com ने ब्रह्मास्त्र डे 1 व्यवसाय शेअर केला आहे. त्यानुसार, चित्रपटाने ओपनिंग डेवर जवळपास 35-36 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने रणबीरच्या आतापर्यंतच्या सर्वात जास्त ओपनिंगच्या पहिल्या दिवसाचे आकडे देखील मागे टाकले आहेत. संजूने 34.75 कोटी रुपये कमवले होते.