महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

धमाल कॉमेडी चित्रपट बॉईज ३ चा ट्रेलर लॉन्च - धमाल कॉमेडी चित्रपट बॉईज ३ चा ट्रेलर लॉन्च

बॉईज सिरीजने सर्वांचच भरपूर मनोरंजन केले आहे. बॉईज आणि बॉईज २ ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः दंगा घातल्यानंतर बॉईज ३ काय नवीन हंगामा घेऊन येणार याकडे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. नुकताच बॉईज ३ च्या संपूर्ण टीमच्या उपस्तिथीत या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले आहे. बॉईज ३ चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे त्रिकूट आणि विदुला करत असलेल्या प्रवासाची झलक आपल्याला पाहायला मिळाली आहे.

कॉमेडी चित्रपट बॉईज ३ चा ट्रेलर लॉन्च
कॉमेडी चित्रपट बॉईज ३ चा ट्रेलर लॉन्च

By

Published : Aug 25, 2022, 4:35 PM IST

मुंबई - शाहरुख खान आणि दीपिका पदुकोन अभिनित आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित चेन्नई एक्सप्रेसमध्ये उत्तर आणि दक्षिण संस्कृतींचा संगम पाहायला मिळाला होता. त्याच धर्तीवर बॉईज ३ या मराठी चित्रपटामध्ये पश्चिम आणि दाक्षिणात्य संस्कृतींचा संगम बघायला मिळेल असा अंदाज त्याचा ट्रेलर पाहून येतो. नुकताच बॉईज ३ चा ट्रेलर अनावरण सोहळा दणक्यात साजरा झाला आणि धैर्य, ढुंग्या आणि कबीर यांच्यातील मैत्री खरंच खूप धमाल करणार आहे हे ट्रेलर पाहून वाटत आहे.

बॉईज सिरीजने सर्वांचच भरपूर मनोरंजन केले आहे. धैर्य, ढुंग्या आणि कबीर ह्या त्रिकूटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळालं. 'बॉईज' आणि 'बॉईज २' ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः दंगा घातल्यानंतर 'बॉईज ३' काय नवीन हंगामा घेऊन येणार याकडे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. नुकताच 'बॉईज ३'च्या संपूर्ण टीमच्या उपस्तिथीत या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले आहे. 'बॉईज ३' चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे त्रिकूट आणि विदुला करत असलेल्या प्रवासाची झलक आपल्याला पाहायला मिळाली आहे. लुंगीतलं हे कमाल त्रिकूट दक्षिण दिशेला करत असलेल्या प्रवासाची ही गोष्ट आहे. त्यांच्या या प्रवासात आलेलं विदुला नावाचे वळण कोणत्या ठिकाणी या तिघांना घेऊन जाणार ते चित्रपट पाहिल्यानंतरच कळणार.

कॉमेडी चित्रपट बॉईज ३ चा ट्रेलर लॉन्च

चित्रपटातील 'लग्नाळू २.o' गाणं प्रेक्षकांना भरपूर आवडले असून विदुलाची वेगळीच छबी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आली आहे. मैत्रीमध्ये एकमेकांना अडचणीत टाकणं असो किंवा त्याच अडचणीतून त्यांना बाहेर काढण्यासाठीची मदत असो मित्र नेहमीच हाजीर असतात. मैत्रीची व्याख्या नव्या अंदाजात ह्या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. विदुलाचा कमाल सेक्सी अंदाज ,सुमंत शिंदे ,पार्थ भालेराव, प्रतीक लाड यांच्या उत्कृष्ट अभिनयाने रंगलेला हा चित्रपट असून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

कॉमेडी चित्रपट बॉईज ३ चा ट्रेलर लॉन्च

या ट्रेलर बद्दल अवधूत गुप्ते म्हणाले, "'बॉईज ३' चित्रपटाचा ट्रेलर पाहून या चित्रपटासाठीची प्रेक्षकांची वाढती उत्सुकता पाहून खूप भारी वाटत आहे. सर्वच 'बॉईज ३' च्या टीमने खूप मेहनत घेतलेली आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षांवर हा चित्रपट खरा उतरेल याची मला खात्री आहे." दिग्दर्शक विशाल सखाराम देवरुखकर म्हणाले, "'बॉईज' आणि 'बॉईज २' ला मिळालेल तुफान प्रतिसाद पाहता मनोरंजनात भर म्हणून यंदा 'बॉईज ३' तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सर्वच कलाकारांनी आपापली भूमिका चोख बजावली आहे. १६ सप्टेंबर ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सर्व प्रेक्षक वर्गाचा प्रेम आणि आशीर्वाद राहो अशी आशा आहे."

कॉमेडी चित्रपट बॉईज ३ चा ट्रेलर लॉन्च

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत 'बॉईज ३' चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या १६ सप्टेंबर रोजी ‘बॅाईज ३’ चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा -लायगर हा मसाला चित्रपट असल्याने प्रेक्षकांनी आवडेल याची अनन्या पांडेला खात्री

ABOUT THE AUTHOR

...view details