मुंबई - Latest 3 flims BO collection :'फुक्रे 3', 'चंद्रमुखी 2', आणि 'द व्हॅक्सिन वॉर' 28 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाले. 'फुक्रे 3' पडद्यावर आल्यापासून चांगली कमगिरी करत आहे. 'फुक्रे 3' ची क्रेझ सध्या पाहायला मिळत आहे. 'फुक्रे 3'नं बॉक्स ऑफिसवरही धमाल केली आहे आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. 28 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला विवेक अग्निहोत्रीच्या 'द वॅक्सीन वॉर' आणि कंगना राणौतच्या 'चंद्रमुखी 2' या चित्रपटाला टक्कर द्यावी लागत आहे. 'फुक्रे 3' बॉक्स ऑफिसवर या सर्व चित्रपटांना मागे टाकत आहे. 'फुक्रे 3', 'द वॅक्सीन वॉर' आणि 'चंद्रमुखी 2' हे चित्रपट आता रिलीजच्या सहाव्या दिवसात आहे.
'फुक्रे 3' चं बॉक्स ऑफिस कलेक्शन :'फुक्रे 3' या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 8.82 कोटीची कमाई केली. त्यानंतर या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर दुसऱ्या दिवशी 7.81 कोटी, तिसऱ्या दिवशी 11.67 कोटी, चौथ्या दिवशी 15.18 कोटी आणि पाचव्या दिवशी 10.86 कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 54.34 कोटी झालं आहे. हा चित्रपट सहाव्या दिवशी 5 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 59.34 होईल. वरुण शर्मा, पुलकित सम्राट, मनजोत सिंग, पंकज त्रिपाठी आणि ऋचा चढ्ढा या कलाकारांनी अप्रतिम अभिनय केला आहे.
'चंद्रमुखी 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : 'चंद्रमुखी 2' हा चित्रपट तामिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं पहिल्या दिवशी सर्व भाषांमध्ये 8.25 कोटीची कमाई केली. त्यानंतर या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 4.35 कोटी, तिसऱ्या दिवशी 5.05 कोटी, चौथ्या दिवशी 6.8 कोटी आणि पाचव्या दिवशी 4.50 व्यवसाय केला. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 28.95 झालं आहे. हा चित्रपट सहाव्या दिवशी 2.5 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 31.38 कोटी होईल. या चित्रपटामध्ये कंगना राणौत आणि राघव लॉरेन्स यांनी खूप चांगला अभिनय केला आहे.
'द व्हॅक्सिन वॉर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : 'द व्हॅक्सिन वॉर'नं प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 85 लाखची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 90 लाख, तिसऱ्या दिवशी 1.75 कोटी, चौथ्या दिवशी 2.25 कोटी आणि पाचव्या दिवशी 1.56 कोटीचा व्यवसाय केला. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 7.25 झाले आहे. हा चित्रपट रिलीजच्या सहव्या दिवशी 85 लाखाची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 8.16 कोटी होईल. या चित्रपटामध्ये पल्लवी जोशी, नाना पाटेकर, राइमा सेन, अनुपम खेर, सप्तामी गौडा, मोहन कपूर हे कलाकार आहेत.
हेही वाचा :
- Hrithik Roshan : 'हू इज युअर गायनेक' या वेब सीरिजसाठी हृतिक रोशननं केलं गर्लफ्रेंड सबा आझादचं कौतुक...
- Aishwarya Rai Bachchan : माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चननं केला पॅरिस फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक; युजर्सनं केलं ट्रोल...
- Tejas teaser out: कंगना राणौत स्टारर 'तेजस' चित्रपटचा टीझर झाला प्रदर्शित; पहा टीझर...