मुंबई - चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी गुरुवारी त्यांची दिवंगत पत्नी आणि दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावरील बायोपिकची घोषणा केली. 'द लाइफ ऑफ ए लिजेंड' असे या चित्रपटाचे शीर्षक असले. संशोधक, लेखक आणि स्तंभलेखक धीरज कुमार यांनी लिहित असलेल्या याच नावाच्या पुस्तकावर आधारित हा चरित्रपट असेल.
बोनी कपूर म्हणाले: 'श्रीदेवी ही निसर्गाची शक्ती होती. जेव्हा तिने तिची कला तिच्या चाहत्यांसोबत पडद्यावर शेअर केली तेव्हा तिला सर्वात जास्त आनंद झाला होता पण ती एक अत्यंत खासगी व्यक्ती होती. धीरज कुमार यांना श्रीदेवी आपल्या कुटुंबाचा सदस्य मानत होती. ते एक संशोधक, लेखक आणि स्तंभलेखक आहेत. आम्हाला आनंद आहे की तो तिच्या असामान्य जीवनाला साजेसे पुस्तक लिहित आहे'
सदा हसमुख श्रीदेवीबद्दल थोडेसे- श्रीदेवी प्रत्येक क्षण, दिवस मुक्तपणे जगणारी खूप सुंदर व्यक्ती होती. पण तिला पती बोनी कपूर जेव्हाही तिच्या वयाची आठवण करून देत असत तेव्हा तिला खूप राग यायचा. श्रीदेवी म्हणजे सौंदर्याचे एक जिवंत उदाहरण होते, आजच्या अभिनेत्री देखील तिच्या 80 च्या दशकातील लुकशी स्पर्धा करू शकत नाही. खरे तर श्रीदेवी हेल्थ कॉन्शियस होती. तिने तिच्या लुकबाबत कधीच तडजोड केली नाही. तिने त्वचेची विशेष काळजी घेतली. यामुळेच श्रीदेवी तिच्या एअरपोर्ट लूकमध्येही छान दिसत होती. असे म्हटले जाते की, श्रीदेवीला कार्यक्रमाला जायला उशीर होत असे कारण ती तयार होण्यासाठी खूप वेळ काढत असे. तिला बॉलिवूडमधील फॅशन दिवा देखील म्हटले जाते. तिची ड्रेसिंग स्टाइल वेगळी होती. श्रीदेवीच्या ड्रेसिंग कलेक्शनमध्ये साड्या जास्त होत्या. श्रीदेवी जेव्हाही देशाबाहेर जायची तेव्हा ती नक्कीच साडी घेऊन यायची. श्रीदेवी बहुतेक कार्यक्रमांमध्ये साडीत दिसायची.