महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Ajay Devgan : अजय देवगण 'दे दे प्यार दे'चा सीक्वलसाठी झाला सज्ज... - de de pyaar de

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण 'दे दे प्यार दे' चिपटाच्या सीक्वलसाठी सज्ज झाला आहे. 'दे दे प्यार दे' हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झाला होता. आता नुकताच तो लव रंजनला या चित्रपटासंदर्भात भेटल्याचे समजत आहे.

Ajay Devgan
अजय देवगण

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2023, 10:37 AM IST

मुंबई :अजय देवगण, तब्बू आणि रकुल प्रीत स्टारर चित्रपट 'दे दे प्यार दे' रूपेरी पडद्यावर खूप गाजला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग अजय देवगण घेऊन येणार आहे. अजय गेल्या अनेक दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर हिट चित्रपट देण्याचा प्रयत्न करत आहे. अजयचे यापूर्वी रिलीज झालेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकले नाही. 'सिंघम अगेन' साइन केल्यानंतर अजय हा दिग्दर्शक लव रंजनसोबत 'दे दे प्यार दे'बद्दल बोलण्यासाठी गेला होता.

'दे दे प्यार दे' चित्रपटाचा सीक्वल : 'दे दे प्यार दे'च्या निर्मात्यांनी चार वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वल बनवण्याचा निर्णय घेतला आहे. 'दे दे प्यार दे 2'वर सध्या काम सुरू असून या चित्रपटाची शूटिंग पुढील वर्षीच्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे. लव रंजन आणि तरुण जैन यांनी या चित्रपटाचं स्क्रिप्ट तयार केलं आहे. 'दे दे प्यार दे 2'चे दिग्दर्शन यावेळी अंशुल शर्मा करणार आहे. अंशुल हा याआधी 'सोनू के टीटू की स्वीटी' आणि 'तू झुठी में मक्कार' या चित्रपटाचा क्रिएटिव्ह डायरेक्टर होता. रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'नंतर अजय देवगण या चित्रपटाची शूटिंग करेल, असा सध्या अंदाज लावला जात आहे. 'दे दे प्यार दे'च्या पहिल्या भागात तब्बू, जिमी शेरगिल, जावेद जाफरी, आणि आलोक नाथ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

'दे दे प्यार दे' चं चित्रीकरण कधी होणार ? : अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंगची जोडी पुन्हा एकदा चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला होता. 'दे दे प्यार दे' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता, त्यामुळे अजयला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. दरम्यान जर अजयच्या सीक्वलबद्दल बोलायचं झालं त्याचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. यापूर्वी अजयने 'सिंघम', 'गोलमाल' आणि 'दृश्यम' या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये काम केले आहेत, आणि हे तिन्ही चित्रपटांचे सीक्वल हिट ठरले आहे. अजय देवगणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटी 'भोला'मध्ये दिसला होता. 'दे दे प्यार दे 2' आणि 'सिंघम अगेन' व्यतिरिक्त त्याच्याकडे 'गोलमाल', आणि औरों में कहाँ दम था' हे चित्रपट आहेत. यासोबतच रकुल प्रीत सिंहच्या प्रदर्शित झालेल्या शेवटच्या चित्रपटाबद्दल सांगायचं तर, ती शेवटी 'छत्रीवाली' या चित्रपटात दिसली होती.

हेही वाचा :

  1. Section 108 exciting teaser: 'सेक्शन १०८' चा रंजक टीझर रिलीज, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी
  2. Gadar 2 vs OMG 2 box office day 19: बॉक्स ऑफिसवर 'गदर 2' करत आहे राज्य...
  3. Aamir return to big screens : आमिर खान रुपेरी पडद्यावर परतणार, पुढच्या ख्रिसमसला होणार धमाका

ABOUT THE AUTHOR

...view details