महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

बॉलीवूड-टॉलिवूड सेलिब्रिटींनी 74 व्या प्रजासत्ताक दिनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा - बॉलीवुडमध्ये प्रजासत्ताक दिन सेलिब्रेशन

आज देशभरात ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. बॉलिवूडमधील सर्व सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षय कुमार ते चिरंजीवीसह अनेक सेलिब्रिटींनी देशवासियांचे अभिनंदन केले.

Bollywood Tollywood celebs wished the countrymen on 74th Republic day 2023
बॉलीवूड-टॉलिवूड सेलिब्रिटींनी 74 व्या प्रजासत्ताक दिनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

By

Published : Jan 26, 2023, 3:11 PM IST

मुंबई : आज 26 जानेवारी 2023 रोजी संपूर्ण देश 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहे. लोक एकमेकांना प्रजासत्ताक दिन 2023 च्या शुभेच्छा देत आहेत. या खास प्रसंगी सिनेतारकांनीही आपापल्या शैलीत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. साऊथ फिल्म इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. चला पाहूया, कोणत्या सेलिब्रिटींनी चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अक्षय कुमार:बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करीत देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आपला अभिमानास्पद वारसा चिन्हांकित करण्याचा दिवस. या वर्षी हा दिवस माझ्यासाठी सर्वात खास असणार आहे. का ते तुम्हाला लवकरच कळेल. जय हिंद.'

अनुपम खेर:हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. अनुपम खेर यांनी एक पोस्ट लिहिली आहे. 'जगात राहणाऱ्या सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन. जय हिंद. भारत माता चिरंजीव हो!' दुसरीकडे, शिवशास्त्री बालबोआचे पोस्टर शेअर करताना अनुपम खेर यांनी लिहिले, 'टीम शिवशास्त्री बालबोआकडून तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.

सुनील शेट्टी:बॉलिवूड स्टार सुनील शेट्टीने ट्विटरवरून देशातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'आपण सर्वजण मिळून भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन आपल्या राष्ट्राबद्दल अभिमान, आदर आणि प्रेमाने साजरा करू या. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.अजय देवगणनेही ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करrत देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राखी सावंत :बॉलिवूडच्या ड्रामा क्वीननेही तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आम्ही आमच्या स्वातंत्र्यसैनिकांना कधीही विसरणार नाही. माझे माझ्या देशावरील प्रेम अमर्याद आहे. माझे माझ्या लोकांवरचे प्रेम अमर्याद आहे. मला फक्त माझ्या देशासाठी आनंद हवा आहे. ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना विशेष शुभेच्छा.

चिरंजीवी :त्याचवेळी, साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार अभिनेता चिरंजीवी यांनीही ट्विट करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने ट्विट करून लिहले की, 'आपली मातृभूमी सदैव समृद्ध होवो. ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण सर्व भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन. याशिवाय कंगना रणौत, पृथ्वीराज सुकुमारन, ज्युनियर एनटीआर यांच्यासह अनेक नामवंत सेलिब्रिटींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details