महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

SRK visit Lalbagcha Raja : लालबागच्या राजाच्या चरणी बॉलिवूडचा किंग नतमस्तक - King Khan met Lalbagcha Raja

SRK visit Lalbagcha Raja : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान मुलगा अबरामसह हजर राहिला. बाप्पाच्या पायाशी नतमस्तक होऊन तो उभा होता. शाहरुखच्या आगमनानंतर मंडपात गर्दी उसळल्याचं चित्र पाहायला मिळालं.

SRK visit Lalbagcha Raja
लालबागच्या राजाच्या चरणी बॉलिवूडचा किंग नतमस्तक

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2023, 1:36 PM IST

Updated : Sep 22, 2023, 2:30 PM IST

मुंबई - SRK visit Lalbagcha Raja : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खाननं मुंबईत लालबागचा राजा गणपती मंडळाला भेट देऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी त्याच्यासोबत धाकटा मुलगा अबराम आणि त्याची मॅनेजर पूजा दादलानीही हजर होती. शाहरुख जेव्हा मंडपातून बाप्पाच्या दिशेन चालत होता तेव्हा त्याला पाहण्यासाठी दुतर्फा गर्दी झाली होती. पांढरा कुर्ता परिधान करुन आलेल्या शाहरुखसोबत त्याच्या मुलानं लाल रंगाचा शर्ट घातला होता. बापलेकानं घेतलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी नेहमीच होत असते. अधून मधून येणाऱ्या सेलेब्रिटींमुळे या गर्दीत भर पडते. शाहरुख जेव्हा मुलगा अबरामसह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आला तेव्हा अशीच गर्दी पाहायला मिळाली. त्याची एक झलक पाहायला, त्याला मोबाईल कॅमेऱ्यानं टिपायला लोक उतावीळ झालेले दिसले.

लालबागच्या राजाच्या चरणी बॉलिवूडचा किंग नतमस्तक

लालाबागच्या राजाच्या पायाशी पोहोचून शाहरुख खानने भक्तीभावाने हात जोडले. अबरामही हात जोडून प्रार्थना करताना दिसला. दोघांनाही पुजाऱ्यांनी कपाळाला टीळा लावला. अबरामला टीळा लावताना शाहरुखने मदत केल्याचं दिसलं. त्यानंतर मिळालेला प्रसाद व नारळ शाहरुखनं स्वीकारला. गेल्या वर्षीही अबराम लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आला होता. मात्र त्यावेळी त्याच्यासोबत शाहरुख नव्हता. यंदा मात्र ते दोघं जोडीनं आले आणि बाप्पासमोर नतमस्तक झाले.

लालाबागच्या राजाच्या दर्शनानंतर मंडळाच्या वतीने त्याला भेट देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनाही त्यानं हात दाखवून नमस्कार केला. यावर्षी त्याचा पठाण आणि जवान हे दोन चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. जवान चित्रपटाला अजूनही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. बॉक्स ऑफिसवर यावर्षी त्याच्या दोन्ही चित्रपटाने अनेक विक्रमांची नोंद केली आहे. त्याचा आगामी डंकी हा राजकुमार हिराणी दिग्दर्शित चित्रपट डिसेंबर महिन्याच्या अखेरीस प्रदर्शित केला जाणार आहे. जवान चित्रपट थिएटरमधून उतरताच शाहरुख डंकीच्या प्रमोशनला सुरुवात करेल. सध्या तो बॉलिवूडमधील सर्वात बिझी स्टार बनला आहे. येणारा काळ त्याच्यासाठी उत्तम असल्याचं संकेत त्याला मिळत आहेत.

Last Updated : Sep 22, 2023, 2:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details