गायक केके यांच्या निधनावर बॉलिवूड सेलिब्रिटींनी व्यक्त केला शोक - गायक कृष्णकुमार कुननाथ
प्रसिद्ध गायक केके यांचा एका मैफिलीदरम्यान गाताना मृत्यू झाला आहे. या दु:खद बातमीने केकेचे चाहते आणि बॉलीवूड स्टार्स हैराण झाले आहेत.
मुंबई -प्रसिद्ध बॉलिवूड गायक कृष्णकुमार कुननाथ यांचे मंगळवारी रात्री कोलकाता येथे निधन झाले. ते केके या नावाने प्रसिद्ध होते. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. केके 53 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दक्षिण कोलकाता येथील नजरुल मंच येथे एका महाविद्यालयाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परफॉर्मन्च्या वेळी केके यांना त्रास जाणवू लागला होता. त्यांना घामही आला. त्यानंतर गायन थांबवून ते हॉटेलवर परतला होता. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.