महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Aftab Shivdasani : बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानीची फसवणूक; बँक खात्यातून दीड लाख गायब - ऑनलाइन फसवणूक

Aftab Shivdasani : बॉलीवूड अभिनेता आफताब शिवदासानी फसवणुकीला बळी पडला आहे. त्याच्या बँक खात्यातून दीड लाख रुपये गायब झाले. त्यानंतर याप्रकरणी त्यानं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Aftab Shivdasani
आफताब शिवदासानी

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2023, 7:02 PM IST

मुंबई - Aftab Shivdasani :आफताब शिवदासानी हा सध्या चर्चेत आला आहे. 'आवारा पागल दीवाना', 'मस्ती', 'ग्रँड मस्ती' आणि 'क्या कूल है हम' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेला आफताब हा ऑनलाइन फसवणुकीचा बळी ठरला आहे. पॅन कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्यानं एका व्यक्तीनं त्याची 1.50 लाखाची फसवणूक केल्याची बातमी समोर आली आहे. दरम्यान आता मुंबई पोलिसांनी 1.50 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी दोन अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आफताब शिवदासानीच्या मोबाईलवर एक मेसेज आला होता. त्यातून हे कांड घडलं.

आफताब शिवदासानी झाली फसवणूक : आफताबला आलेल्या मेसेजमध्ये असे लिहिलं होतं, प्रिय AXIS खातेधारक, आज तुमचे खाते निलंबित केले जाईल, कृपया तत्काळ पॅन नंबर अपडेट करा. खालील लिंकवर क्लिक करा. त्यानंतर आफताबनं या संदेशातील लिंकवर क्लिक केलं. त्यानंतर, अ‍ॅक्सिस बँक पेज उघडलं. त्याला एका नंबरवरून कॉल आला. कॉलरने स्वतःची ओळख अ‍ॅक्सिस बँकेचा कर्मचारी अशी करून दिली. त्याच्या सांगण्यावरुन आफताबनं माहिती दिली. त्यातच तो फसला.

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल :कथित अ‍ॅक्सिस बँकेच्या पेजवर त्याला मोबाइल नंबर आणि एमपीआयएन क्रमांक टाकण्यास सांगण्यात आलं. कॉलरनं सांगितल्याप्रमाणे त्यानं सर्व तपशील भरला. त्यानंतर त्याच्या बँक खात्यातून 1,49,999 रुपये डेबिट झाल्याचा संदेश आला. आफताबनं वांद्रे पोलीस ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीची तक्रार दाखल केली. भारतीय दंड संहिताच्या कलम 419 आणि 420 तसंच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (C) आणि 66 (D) अंतर्गत 9 ऑक्टोबरला वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंदविण्यात आला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे सेलिब्रिटीही ऑनलाइन फसवणुकीचे बळी ठरले :आफताब शिवदासानी ऑनलाइन फसवणुकीचा बळी ठरलेला पहिला अभिनेता नाही. यापूर्वी अन्नू कपूर देखील 4.36 लाख रुपयांच्या फसवणुकीचे बळी ठरले होते. अन्नू कपूर यांना बँक अधिकारी असल्याचं सांगून केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्यानं फसवण्यात आलं होतं. याशिवाय शबाना आझमी आणि पायल रोहतगी यांचीही ऑनलाइन फसवणूक झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details