मुंबई - Bobby Deol in Animal :बॉबी देओलनं 'धरम वीर' या चित्रपटाद्वारे वयाच्या दहाव्या वर्षी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर तो 1995 मध्ये 'बरसात' या चित्रपटामध्ये ट्विंकल खन्नासोबत दिसला. हा चित्रपट राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केला होता. बॉबी देओलची वाऱ्यावर फिरणारी कर्लिंग हेअरस्टाईल आणि लेदर फर जॅकेटवरचं त्यांच लूक सर्वाचं आठवत असेल. 'सोल्जर' या चित्रपटामुळं त्यानं हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला. त्यानंतर बॉबीनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं, पण त्याला पाहिजे तसे यश बॉलिवूडमध्ये मिळाले नाही.
'अॅनिमल' चित्रपटामध्ये दिसेल खलनायकाच्या भूमिकेत :दरम्यान 2020 मध्ये, बॉबी देओलनं आश्रम या वेब सीरीजद्वारे जबरदस्त पुनरागमन केलं. आता 54 वर्षांचा बॉबी देओल आगामी 'अॅनिमल' या चित्रपटात आपल्या डॅशिंग लूकसह खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपट 'अॅनिमल'मधील खलनायकाच्या भूमिकेसाठी त्यानं जिममध्ये खूप मेहनत घेतली आहे. विशेष म्हणजे बॉबी देओलच्या लूकमुळे 'अॅनिमल' डायरेक्टर संदीप रेड्डी वंगा यांनी त्याला चित्रपटात खलनायकाची भूमिका ऑफर केली होती. संदीप यांनी सांगितलं की, ते 'अॅनिमल'साठी अशाच स्टाईलच्या शोधात होते.