मुंबई -Dharmendra praised Bobby Deol :दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'अॅनिमल'मध्ये अभिनेता बॉबी देओलनं दमदार अभिनय केला आहे. आपली रोमँटिक चॉकलेट बॉयची प्रतिमा बदलून बॉबीनं 'अॅनिमल' मधील त्याच्या उग्र व्यक्तिरेखेनं सर्वांना प्रभावित केलं आहे. प्रेक्षक आणि चाहत्यांनी बॉबीच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. दरम्यान बॉबीचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांनी या चित्रपटाबाबत आणि त्याच्या भूमिकेबद्दल प्रतिक्रिया शेअर केली. एका मुलाखतीत बॉबी देओलनं त्याच्या अलीकडील रिलीज झालेल्या 'अॅनिमल' चित्रपटातील भूमिकेबद्दल वडील धर्मेंद्रनं याबद्दल काय म्हटलं याचा खुलासा केला आहे.
बॉबी देओलची मुलाखत : बॉबीनं सांगितलं की, ''माझे वडील एक महान व्यक्ती आहेत आणि जर त्यांच्यासारखे कोणी माझ्याबद्दल असे म्हणत असेल, तर मला ही मिळालेली सर्वात चांगली प्रशंसा आहे. मी फक्त माझ्या वडिलांवर खूप प्रेम करतो. मी जेव्हा घरी गेलो होतो, तेव्हा ते त्याच्या फोनवर इन्स्टाग्राम आणि यूट्यूब पाहत होते आणि ते मला म्हणाले, ''सगळे तुझ्यासाठी वेडे झाले आहेत." मी त्यांना म्हणालो, ''हो बाबा, मी तुमचा मुलगा आहे, लोक या चित्रपटाबाबत क्रेझी झाले आहेत. त्यांना माझा खूप अभिमान आहे आणि मी खूप आनंद आहे." याशिवाय बॉबीनं पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, 'अॅनिमल'मधील त्याच्या भयानक भूमिकेवर त्याची आई प्रकाश कौरची प्रतिक्रिया देखील उघड करत सांगितलं की, ''माझ्या आईला माझी भूमिका आवडली नाही कारण मी या चित्रपटात साकारलेली व्यक्तिरेखा शेवटी मरण पावते. माझी आई हा चित्रपट पाहू शकली नाही. पुढं त्यानं म्हटलं की, माझ्या आईला तिच्या मैत्रिणींकडून खूप कॉल येत आहेत."