मुंबई: बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल आणि त्यांची पत्नी तान्या देओल यांचा आज लग्नाचा आज वाढदिवस असून त्यांच्या लग्नाला आज 27 वर्ष पूर्ण झाली आहे. बॉबीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर एक मनमोहक फोटो शेअर करत पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहले, '27 व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा माझे प्रेम कायमचे तुझे.' फोटोमध्ये, बॉबी हा त्याच्या पत्नीसोबत पोझ देताना दिसत आहे. त्याने हे फोटो शेअर केल्यानंतर लगेचच, त्याच्या कुटुंबाने, चाहत्यांने आणि मित्रांने यावर लाल हृदय आणि फायर इमोटिकॉन्ससह कमेंट केल्या आहे. तसेच वाढदिवसानिमित्त बॉबीचे वडील सुपरस्टार धर्मेंद्र यांनी देखील या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
बॉबी देओलचा लग्नाचा वाढदिवस :बॉबीच्या पोस्टवर कमेंट करताना धर्मेंद्रने लिहिले, 'हॅपी अॅनिव्हर्सरी, लव्ह यू किड्स,' तर अभिनेता चंकी पांडेने लिहिले, 'हॅपी हॅपी अॅनिव्हर्सरी माय डिअरेस्ट.' बॉबी आणि तानिया 30 मे 1996 रोजी लग्नाच्या बंधनात अडकले. या जोडप्याने 2001 मध्ये मुलगा आर्यमन झाला तर 2004मध्ये त्यांना मुलगा धरम झाला. या जोडप्याने नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्य हे मीडिया पासून दूर ठेवले. दरम्यान,बॉबी वर्क फ्रंटवर बोलायच झाले तर शेवटी तो प्रकाश झा यांच्या आश्रम 3 या राजकीय वेब सिरीजमध्ये दिसला होता. ही वेब सिरीज एमएक्स प्रेयरवर प्रदर्शित झाली होती.