महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

आर्यमन देओल २१ वा वाढदिवस: बॉलिवूड प्रवेशाचा मुहूर्त कधी? चाहते उतावीळ - Aryaman photo

बॉबी देओलने मुलगा आर्यमनला त्याच्या २१व्या वाढदिवसानिमित्त गोड शुभेच्छा दिल्या आहेत. इंस्टाग्रामवर बॉबीने आर्यमनसोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, "हॅप्पी बर्थडे माय एंजेल."

बॉबी आणि आर्यमन
बॉबी आणि आर्यमन

By

Published : Jun 16, 2022, 10:56 AM IST

मुंबई- अभिनेता बॉबी देओलचा मोठा मुलगा व धर्मेंद्रचा नातू आर्यमन आज आपला २१ वा वाढदिवस साजरा करीत आहे. बॉबी देओलने सोशल मीडियावर त्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा पोस्ट केल्या. शुभेच्छा देणाऱ्या अनेकांनी आर्यमनला बॉलिवूड प्रवेशसाठीही शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचे फोटो पाहून अनेकांनी त्याची तुलना आजोबा धर्मेंद्र यांच्याशी केली आहे. तो बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार याची उत्सुकता देओल परिवारासह धर्मेंद्र, सनी आणि बॉबीच्या चाहत्यांना लागून राहिली आहे.

आजोबांसोबत आर्यमन

इंस्टाग्रामवर बॉबीने आर्यमनसोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, "हॅप्पी बर्थडे माय एंजेल." फोटोमध्ये बॉबी आणि आर्यमन काळ्या टी-शर्टमध्ये दिसत आहेत.

बॉबी आणि आर्यमन

बॉबीने आपल्या मुलाला शुभेच्छा देताच, चाहते आणि चित्रपट उद्योगातील सदस्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आर्यमनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "वाह!! वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा... खूप प्रेम," अभिनेता राहुल देव यांनी कमेंट केली आहे. "हॅपी हॅपी बर्थडे आर्यमन," गायक दर्शन कुमार यांनी लिहिले. "देव त्याला आशीर्वाद देओ," एका नेटिझनने टिप्पणी केली.

सनी आणि बॉबीचे आर्यमन प्रेम

बॉबी आणि त्याची पत्नी तान्या देओल यांनी 2001 मध्ये मुलगा आर्यमन आणि 2004 मध्ये मुलगा धरमचे स्वागत केले. आर्यमन यूएसमध्ये बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे.

बॉबीच्या कामाच्या प्रकल्पांबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या 'एक बदनाम...आश्रम 3' च्या यशाची चव चाखत आहे. प्रकाश झा यांच्या दिग्दर्शनात त्यांनी 'भगवान' बाबा निराला ही भूमिका साकारली आहे. 'अपने 2'मध्ये बॉबी वडील धर्मेंद्र आणि भाऊ सनी देओलसोबत तो स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

हेही वाचा -'शिवाजी: द बॉस'ची १५ वर्षे : दिग्दर्शक एस शंकरने घेतली रजनीकांतची भेट

ABOUT THE AUTHOR

...view details