महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

बॉबी देओलनं मुलगा आर्यमन देओलसोबतचे शेअर केले फोटो - अ‍ॅनिमल

Bobby deol and his son : 'अ‍ॅनिमल'मध्ये आपल्या धमाकेदार अभिनयानं छाप पाडणाऱ्या बॉबी देओलनं अलीकडेच मुलगा आर्यमनसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो अनेकांना आवडले आहेत.

Bobby deol and his son
बॉबी देओल आणि त्याचा मुलगा

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 1:23 PM IST

मुंबई - Bobby deol and his son : अभिनेता बॉबी देओलनं मुलगा आर्यमन देओलसोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये पिता-पुत्राची जोडी एकदम हटके दिसत आहे. हे फोटो पाहिल्यानंतर अनेकजण बॉबी आणि आर्यमनचे कौतुक करत आहे. या फोटोंवर अभिनेत्री प्रीती झिंटानेही प्रतिक्रिया दिली आहे. बॉबी देओल सध्या त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटामध्ये त्यानं खलनायक अबरार हकची भूमिका साकारली होती. 'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या रणबीर कपूरनं देखील बॉबीच्या अभिनयाचं कौतुक केलं होत.

बॉबी देओलनं शेअर केला फोटो :बुधवारी सकाळी, बॉबी देओलननं आर्यमन देओलसोबतचे फोटो शेअर करून चाहत्यांना खुश केलं आहे. सध्या बॉबीच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, ''बॉलिवुडचा आगामी हँडसम हंक सुपरस्टार.'' दुसऱ्या एकानं लिहिल, ''वडील आणि मुलाची जोडी सुंदर आहे.'' आणखी एका लिहिलं, ''देओल जूनियर नक्कीच बॉलिवूडचा आगामी सुपरस्टार आहे.'' अशा अनेक कमेंट्स या पोस्टवर येत आहेत. याशिवाय काहीजण फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत. या फोटोमध्ये बॉबी आणि आर्यमननं काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. काही वेळातच या फोटोला हजारो लाईक्स मिळाले आहे.

बॉबी देओल वर्कफ्रंट : बॉबी देओल मुलगा आर्यमन देओल हा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तो येत्या 3-4 वर्षांत चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याचं बॉबीनं एकदा सांगितलं होत. एका मुलाखती दरम्यान बॉबीला विचारण्यात आले की, तो आपल्या मुलांना लॉन्च करण्याचा विचार करत आहे. तेव्हा त्यानं सांगितले की, सध्या असं कोणतेही नियोजन नाही. आर्यमाननं आता शिकावं. चांगली मेहनत घ्यावी, अशी माझी इच्छा आहे.'' आर्यमननं 'एनवाययू स्टर्न'मधून पदवी प्राप्त केली आहे. दरम्यान बॉबीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तो 'हरी हरा वीरा मल्लू' या चित्रपटामध्ये पवन कल्याणसोबत दिसणार आहे. याशिवाय तो 'कांगुवा'मध्ये झळकेल.

हेही वाचा :

  1. अरबाज खानचा मुलगा अरहान खान रवीना टंडनची मुलगी राशा थडानीसोबत झाला स्पॉट
  2. आयरा खान-नुपूर शिखरेचा आज महाराष्ट्रीयन पद्धतीन होणार विवाह, नुपूर रोमँटिक पोस्ट केली शेअर
  3. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंची संघर्षगाथा मोठ्या पडद्यावर

ABOUT THE AUTHOR

...view details