मुंबई- पुष्पा फेम साऊथ स्टार अल्लू अर्जुनचे फक्त साऊथमध्येच नाहीत तर बॉलिवूडमध्येही त्याचे अनेक चाहते आहेत. 8 एप्रिल 1982 रोजी चेन्नईमध्ये जन्मलेला अल्लू अर्जुन 41 वर्षांचा झाला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते मध्यरात्रीपासूनच आपापल्या स्टाइलमध्ये त्याला शुभेच्छा देत आहेत. चाहते सतत त्यांच्या स्टार्सच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या उत्तराची वाट पाहत असतात. इंडस्ट्रीतील चाहते त्याला अल्लू, अर्जुन बनी, मालू अर्जुन, डान्सिंग डायनामाइट, स्टायलिश स्टार अशा अनेक नावांनी हाक मारतात. साऊथमधील अनेक दिग्गज स्टारही अल्लू अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
अल्लूने फिल्म इंडस्ट्रीत 20 वर्षे पूर्ण केली - नुकतीच साऊथ स्टार अल्लू अर्जुनने फिल्म इंडस्ट्रीत 20 वर्षे पूर्ण केली आहेत. एका आठवड्यापूर्वी, त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर धन्यवाद संदेशासह एक फोटो पोस्ट करताना यावर लिहिले होते, मला चित्रपटसृष्टीत २० वर्षे पूर्ण झाली आहेत. इंडस्ट्रीचे प्रेम आणि आशीर्वाद यासाठी मी आभारी आहे. आज मी जो काही आहे ते फक्त माझ्या प्रेक्षक आणि चाहत्यांच्या प्रेमामुळेच आहे.. मनापासून धन्यवाद.
पुष्पातील अर्जुनचा हटके लूक - 'पुष्पा'च्या यशानंतर लवकरच तो 'पुष्पा 2 द रुल'मध्ये दिसणार आहे. शुक्रवारी, वाढदिवसाच्या एक दिवस आधी, अल्लू अर्जुनने पुष्पा 2 चे पोस्टर एका नवीन लूकमध्ये रिलीज करून सर्वांना आश्चर्यचकित केले. 2003 मध्ये गंगोत्री या चित्रपटातून डेब्यू केलेल्या अल्लू अर्जुनने अनेक साऊथ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचे अनेक प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत. अर्जुन अल्लूच्या नावावर अनेक उत्कृष्ट चित्रपट आहेत आणि त्यामध्ये काम करण्यासाठी त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. स्टारला 6 फिल्मफेअर पुरस्कार आणि 3 नंदी पुरस्कारांसह इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अल्लू अर्जुनने 2011 मध्ये स्नेहा रेड्डीशी लग्न केले होते. त्यांना २ मुले आहेत.
अल्लु अर्जुनची मुलगी अर्हा - अल्लु अर्जुनची मुलगी अल्लु अर्हा समंथा रुथ प्रभूचा आगामी चित्रपट शाकुंतलम यामधून अभिनयात पदार्पण करणार आहे. काही दिवसापूर्वी शाकुंतलमच्या ट्रेलरमध्ये पीरियड ड्रामामधून अर्हाची झलक पाहायला मिळाली होती. केवळ ६ वर्षाची असलेली अर्हा अत्यंत आत्मविश्वासाने शाकुंतलच्या सेटवर वावरताना दिसली होती. या सेटवर २०० क्रू मेंबर्सची गर्दी असतानाही तिच्या कॅमेऱ्यासमोर वावरण्यावर कोणताही दबाव आला नव्हता.
हेही वाचा -Pushpa 2 Poster : अल्लू अर्जुनने साडी नेसलेल्या पुष्पा 2 च्या पोस्टरचे समंथाने केले कौतुक, नेटिझन्स म्हणतात 'फूल नहीं आग है'