महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी ''एकुलती एक'' श्रिया पिळगावकर -

श्रिया पिळगावकरचा आज ३३ वा वाढदिवस आहे. सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेक असलेल्या श्रियाने आपल्या आई वडिलांचा अभिनयाचा वारसा नेटकेपणाने पुढे जपला आहे. आज ती जाहिरात, वेब सिरीज आणि बॉलिवूड या मनोरंजन क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळ निर्माण करु शकली आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करुयात.

श्रिया पिळगावकर
श्रिया पिळगावकर

By

Published : Apr 25, 2022, 10:19 AM IST

श्रिया पिळगावकरचा आज ३३ वा वाढदिवस आहे. सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेक असलेल्या श्रियाने आपल्या आई वडिलांचा अभिनयाचा वारसा नेटकेपणाने पुढे जपला आहे. आज ती जाहिरात, वेब सिरीज आणि बॉलिवूड या मनोरंजन क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळ निर्माण करु शकली आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करुयात.

श्रिया ही प्रसिद्ध मराठी अभिनेते सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची एकुलती एक मुलगी आहे. लहानपणी श्रियाने शाळेत असतानाच व्यावसायिक जलतरणपटू बनण्याचे प्रशिक्षण घेतले होते आणि अनेक पदके जिंकली होती. ती मोठी झाल्यावर अनुवादक किंवा भाषातज्ञ बनू शकते या विश्वासाने सचिन पिळगावकरांनी तिला लहानपणी जपानी भाषेचे शिक्षणही दिले. नंतर वेगळा मार्ग निवडण्याचे ठरवून श्रियाने मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये समाजशास्त्रात पदवी पूर्ण केली. श्रिया पिळगावकर लहानपणी कथ्थक शिकली आहे.

वयाच्या पाचव्या वर्षी श्रिय पिळगावकर पहिल्यांदा टेलिव्हिजनवर ''तू तू मैं मैं'' या हिंदी मालिकेत बिट्टू नावाच्या मुलाच्या भूमिकेत दिसली होती. ती 2012 मध्ये करण शेट्टीच्या 10 मिनिटांच्या 'फ्रीडम ऑफ लव्ह' या छोट्या नाटकातील तिच्या अभिनयाने रंगमंचावर पदार्पण केले. हे नाटक एनसीपीएच्या शॉर्ट अँड स्वीट फेस्टिव्हलचा एक भाग होता. नाटकात तिने अभिनय केला, गायन आणि नृत्यही केले होते.

फ्रीडम ऑफ लव्हमधील तिच्या अभिनयानंतर श्रिय पिळगावकरने 2013 मध्ये ''एकुलती एक'' या मराठी चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटात तिने अरुण देशपांडे (सचिन पिळगावकर) आणि नंदिनी (सुप्रिया पिळगावकर) यांची मुलगी स्वरा ही भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती करणारे तिचे वडील (सचिन पिळगावकर) यांनी तिला स्वरा या भूमिकेची ऑफर दिली होती. या चित्रपटाच्या पदार्पणामुळे तिला सहा पुरस्कार मिळाले. त्यापैकी सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार होता, जो तिला 51 व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये मिळाला होता.

एकुलती एक मधील तिच्या भूमिकेनंतर श्रिया पिळगावकने मागे वळून पाहिले नाही. तिला ऑस्कर-विजेता दिग्दर्शक क्लॉड लेलौच यांनी दिग्दर्शित केलेल्या अन प्लस उन ( Un plus une ) या फ्रेंच चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात तिने अयाना या भारतीय नृत्यांगना आणि अभिनेत्याची भूमिका साकारली होती.

श्रिया पिळगावकरने 2016 मध्ये मनीष शर्मा लिखित आणि दिग्दर्शित आणि आदित्य चोप्रा निर्मित यशराज फिल्म्सद्वारे ''फॅन'' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मनीष शर्मा यांनी घेतलेल्या ७५० मुलींच्या ऑडिशनमधून श्रिया पिळगावकरची तिच्या भूमिकेसाठी निवड झाली आणि शाहरुख खानसोबत भूमिका साकारण्याची संधी तिला मिळाली.

2018 मध्ये श्रियाने अॅमेझॉन प्राइम इंडिया शो ''मिर्झापूर''मध्ये स्वीटी गुप्ताची भूमिका साकारली होती. ही वेब सिरीज प्रचंड यशस्वी झाली आणि श्रिया लोकांमध्ये एक लोकप्रिय चेहरा बनली ती द गॉन गेम आणि क्रॅकडाउन या दोन वेबसिरीजमध्ये दिसली होती.

श्रियापिळगावकरने मॉडेलिंग केले असून ती जाहिरात विश्वातही ओळखली जाते. तिने शाहिद कपूर आणि विक्रांत मॅसी यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींसोबत काम केले आहे, जाहिरातींमध्ये अभिनय केला आहे.

श्रिया पिळगावकरची नवीन वेब सिरीज गिल्टी माईंड सध्या अमेझॉन प्राईमवर सुरू आहे. यात ती करारी वकिलाच्या भूमिकेत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी भरपूर दाद दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details