मुंबई- बॉलिवूड कॉरिडॉरमधून आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खरंतर, बॉलिवूडची सुपरहिट अभिनेत्री आलिया भट्टनंतर आता बॉलिवूडची आणखी एक सुंदर अभिनेत्री बिपाशा बसू आई बनली आहे. अभिनेत्रीने शनिवारी (12 नोव्हेंबर) एका मुलीला जन्म दिला आहे. बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरच्या घरात लग्नाच्या 6 वर्षांनंतर पाळणा हलणार आहे. 2016 मध्ये दोघांचे लग्न झाले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने एका मुलीला जन्म दिला असून या गुड न्यूजमुळे संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण आहे. करण आणि बिपाशाने यावर्षी प्रेग्नेंसीची घोषणा केली होती आणि तेव्हापासून चाहते त्यांच्या पहिल्या मुलाची आतुरतेने वाट पाहत होते.
बिपाशाने पूर्ण काळजी घेतली- बिपाशाने तिच्या संपूर्ण गर्भधारणेदरम्यान स्वतःची काळजी घेतली होती आणि वेळोवेळी तिच्या चाहत्यांसह व्हिडिओ आणि काही फोटो शेअर करून तिची स्थिती सांगितली होती. त्याचबरोबर बिपाशा बसूही अनेक व्हिडिओंमध्ये मस्ती करताना दिसली. करण आणि बिपाशाने एकत्र अनेक मॅटर्निटी फोटोशूट देखील केले होते, ज्यामुळे बिपाशाला ट्रोल देखील व्हावे लागले होते.