मुंबई - Bipasha Basu : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू ही सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते. सध्या ती मातृत्वाचा आनंद लुटत आहे. यामुळेच ती सध्या फिल्मी दुनियेपासून दूर आहे. बिपाशा अनेकदा सोशल मीडियावर वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अपडेट्स आपल्या चाहत्यांना देत असते. याशिवाय, ती तिच्या मुलीशी संबंधित अनेकदा फोटो पोस्ट करत असते. दरम्यान आता बिपाशा तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक बूमरँग क्लिप पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तिच्यासोबत तिचा मुलगी देवी ही तिच्या मांडीवर बसून तिच्यासोबत खेळताना दिसत आहे. या पोस्टवर तिनं लिहिलं 'ती मला करंगळी दाखवत खेळत आहे! बेबीचा चॅटरबॉक्स, अगदी आईप्रमाणे' या शिवाय दुसऱ्या बूमरँग क्लिपमध्ये तिनं लिहिलं, 'एखाद्याला आईचे नाक आवडते, मला माही0त आहे की ते एक सुंदर नाक आहे'. असं तिनं कॅप्शन दिलं आहे.
बिपाशा बसूनं शेअर केली पोस्ट :बिपाशा सध्या आपल्या मुलीसोबत क्वालिटी टाइम घालवत आहे. 30 एप्रिल 2016 रोजी करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केल्यानंतर बिपाशाला 12 नोव्हेंबर 2022 रोजी मुलगी झाली. या जोडप्यानं आपल्या मुलाचं नाव देवी असं ठेवलं. बिपाशा आणि करणनं त्यांच्या मुलीचा 10 महिन्यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्तानं घरी सत्यनारायणची पूजा केली. या पूजेमध्ये तिच्यासोबत तिचे कुटुंबिय उपस्थित होते. पूजेमध्ये देवीनं कलरफुल घागरा परिधान केला होता. यावेळी देवी ही खूप खास दिसत होती. यासोबत बिपाशानं निळ्या रंगाचा सलवार घातला होता. यावर तिनं सुंदर असे इयररिंग घातले होते. साध्या मेकअपमध्ये ती खूप खास दिसत होती. आता सध्या बिपाशा बसू ही तिच्या कुटुंबासह आणि तिच्या मुलासोबत चांगला वेळ घालवत आहे.