मुंबई- बॉलिवूड सेलिब्रिटी अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या आलिशान गाड्या सोडल्या आणि कामावर पोहोचण्यासाठी दुचाकीवर बसून प्रवास करणे पसंत केले. मुंबईतील वाहतुकी कोंडीतून त्यांनी अशा प्रकारे स्वतःपुरता मार्ग काढला. रविवारी अमिताभ यांनी अशी दुचकीवर बसून सवारी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनुष्का शर्मानेही हाच मार्ग अवलंबला. अनुष्काला दुचाकीवरुन जाताना पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.
नेटिझन्सच्या बिग बी आणि अनुष्का विरुद्ध तक्रारी- अमिताभ आणि अनुष्काचे फोटो आणि व्हिडिओ ऑनलाइन समोर आल्यानंतर, अनेक सोशल मीडिया युजर्सनी तक्रार केली की अभिनेता बच्चन किंवा चालक दोघांनीही हेल्मेट का घातलेले नाहीत. ट्विटरवर नेटिझन्सनी त्यावर आक्षेप घेतला आणि मुंबई पोलिसांना टॅग देखील केले. पोलिसांनी ट्विटवर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, 'आम्ही हे वाहतूक शाखेशी शेअर केले आहे.' खरंतर जेव्हा अमिताभ यांनी बाईक राइड करत असतानाची पोस्ट शेअर केली होती तेव्हाच त्या दुचाकीस्वाराकडे अथवा अमिताभ यांच्याकडे हेल्मेट नव्हते. त्यामुळे यावर टीका होणार हे नक्की होते.