मुंबई - बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा पहिला प्रोमो नुकताच रिलीज झाला आणि त्यात सुपरस्टार सलमान खान झळकला आहे. या शोचे जिओ सिनेमावर यंदाच्या सीझनचे स्ट्रीमिंग होणार आहे. बिग बॉस ओटीटीचा पहिला सीझन चित्रपट निर्माता करण जोहरने होस्ट केला होता, परंतु निर्मात्यांनी दुसऱ्या सीझनसाठी मूळ होस्ट सलमान खानला परत आणण्यात यश मिळवले आहे.
सलमानचा बिग बॉस ओटीटी प्रोमो - पहिल्या प्रोमो व्हिडिओमध्ये, सलमान खान प्रेक्षकांना विचारताना दिसत आहे की इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) संपल्यानंतर ते काय पाहतील, कारण रविवारी आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. त्यानंतर तो पुढे म्हणतो की ते २४ तास मनोरंजन करू शकतात कारण बिग बॉस ओटीटी लवकरच जिओ सिनेमावर स्ट्रिम होणार आहे.
जिओ सिनेमावर होणार बिग बॉस ओटीटीचे स्ट्रिमिंग - प्रोमोमध्ये सलमानने मॅचिंग टी-शर्ट असलेले चमकदार चांदीचे जाकीट घातलेले आहे. तो प्रेक्षकांना विचारतो, 'क्रिकेटनंतर काय पाहायचे ही द्विधा अवस्था आहे ? जिओ सिनेमावर आता चोवीस तास मनोरंजन होणार आहे. मी घेऊन येतोय बिग बॉस ओटीटी.. तर पाहात राहील भारत'. प्रोमो होताच नेटिझन्सने ट्विटरवर त्वरित प्रतिक्रिया दिली. एका युजरने लिहिले की, प्रतीक्षा करू शकत नाही!, तर दुसर्याने लिहिले, 'स्पर्धकांची यादी कधी बाहेर येईल?'