मुंबई: 'बिग बॉस ओटीटी २'मध्ये एल्विश यादवने शो जिंकून इतिहास रचला आहे. वाइल्डकार्ड स्पर्धक बनून आलेला 'बिग बॉस' जिंकणारा एल्विश हा पहिला स्पर्धक बनला आहे. एल्विशने चाहत्यांचे आभार मानले आहेत. हा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, असे त्याने म्हटले आहे. 'बिग बॉस ओटीटी २'चा फिनाले १४ ऑगस्टला रात्री झाला. फिनालेमध्ये एल्विश यादव अभिषेक मल्हान आणि मनिषा राणीमध्ये टक्कर होती. यामध्ये एल्विश बाजी मारत हा खिताब आपल्या नावावर केला. एल्विश यादवला 'बिग बॉस ओटीटी २'च्या ट्रॉफीशिवाय २५ लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळाले, तर अभिषेक मल्हान हा दुसऱ्या क्रमांकावर आला.
इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करून आभार मानले :एल्विशने इन्स्टाग्राम स्टोरीवर ट्रॉफी हातात घेतलेला फोटो शेअर केला आणि चाहत्यांचे आभार मानले. त्यांने पोस्टमध्ये लिहिले की, 'थँक्यू एल्विश आर्मी, हा तुमचा विजय आहे, एल्विश यादव तुम्हा सर्वांशिवाय काहीच नाही. मी हे अनेकवेळा सांगितले आहे, मी तुमचे प्रेम भेटविण्याच्या लायकीचा नाही, पण प्रत्येक वेळा तुम्ही मला प्रेम देतच गेले. असे त्याने पोस्टमध्ये शेअर केले आहे. एल्विशने या पोस्टद्वारे चाहत्यांचे आभार मानले आहे. याशिवाय त्याने एल्विस आर्मीला ट्रॉफी घेण्यास सांगितले आहे. एल्विश बिग बॉस ओटीटीचा विजेता झाल्यानंतर त्याचे चाहते देखील आनंदी आहे. एल्विशच्या पोस्टवर अनेकजण त्याला शुभेच्छा देत आहे.