महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Bigg Boss OTT 2: पूजा भट्टने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल केले स्फोटक खुलासे - why did pooja bhatt divorce manish makhija

बिग बॉस ओटीटी २ हा वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो सुरू होऊन अवघे काही दिवस झाले आहेत आणि स्पर्धक एकमेकांच्या आयुष्याबद्दल तपशील शेअर करत आहेत.

Bigg Boss OTT 2
बिग बॉस ओटीटी 2

By

Published : Jun 23, 2023, 1:04 PM IST

मुंबई: अभिनेत्री-चित्रपट निर्माती पूजा भट्टने बिग बॉस ओटीटी २ च्या लेटेस्ट भागामध्ये तिच्या खाजगी आयुष्याविषयी खुलासा केला, ज्यामध्ये तिने मनीष माखिजापासून घटस्फोट का घेतला हे सांगितले. लग्नाच्या दशकभरानंतर पुजाने २०१४ मध्ये घटस्फोट घेतला. शोमध्ये ती खाजगी आयुष्याबद्दल आणि नातेसंबंधांबद्दल बोलताना म्हणाली, 'माझ्या लग्नाला जवळपास ११ वर्षे झाली होती. आम्ही वाटले की काहीतरी बरोबर नाही, मग खोटे बोलून का जगायचे. 'तिच्या एक्स जोडीदाराला एक चांगला माणूस म्हणून संबोधून ती पुढे म्हणाली, 'तो अभिनेता नव्हता, परंतु तो मीडिया व्यवसायाशी संबंधित होता आणि तो एक चांगला माणूस होता.'मला स्वत:ची मुले नको होती आणि मी खोटं बोलू शकत नाही... काहीही झाले तरी तो चांगला होता. आम्ही एकमेकांचा सन्मान राखला आणि मार्ग वेगळे केले. याआधी, पुजाने वयाच्या ४४ व्या वर्षी मद्यपानाशी लढा दिला. 'पुढे तिने सांगितले की, मला मद्यपानाची समस्या होती.

पुजाने केला खुलासा :'मी माझे व्यसन मान्यही केले. त्यानंतर मी व्यसन सोडण्याचा निर्णय घेतला' तिने पुढे सांगितले की, आपल्या समाजात पुरुषाला मद्य पिण्याचा परवाना मिळतो त्यानंतर मद्य पिल्यानंतर यावर ते बोलू पण शकतात मात्र स्त्रिया या स्वातंत्रपणे मद्य पिऊ शकत नाही आणि यावर बोलू पण शकत नाही. 'मी मद्य पिते हे मी मान्य केले, मला मद्य सोडायचे होते यावर देखील मी बोलले. मला लोक 'अल्कोहोलिक' म्हणाचे. स्त्रियांनी मद्य पिले तर समाज या गोष्टीला मान्य करत नाही.

अभिनेत्री-चित्रपट निर्माती पूजा भट्ट

पुजाला मद्य पिण्याची वाईट लागली : पुजाला मद्य पिण्याची फार सवय लागली होती, मात्र आता तिने मद्य पिणे सोडले आहे. तिने सर्व कसे हाताळले याबद्दल पुढे सांगितले , 'दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याबद्दल मोकळेपणाने बोला. दारूच्या व्यसनातून सावरल्यावर मला समजले की मी बरे व्हावे त्यामुळे मी मद्य पिणे सोडले. पुजा भट्ट ही बिग बॉस ओटीटी २ मुळे आजकाल फार चर्चेत आहे. ती बिग बॉस शोमध्ये प्रेक्षकांचे फार मनोरंजन करते.

हेही वाचा :

  1. Adipurush Row : 'महाभारत'च्या संवादावरुन झाला होता वाद, निर्मात्यांनी एका रात्रीत कोर्टातून सोडवला होता प्रश्न
  2. Jawan stuntman praised SRK : 'जवान'च्या प्रत्येक अ‍ॅक्शननंतर शाहरुख स्टंटमॅनची करायचा विचारपूस
  3. Bawaal at the Eiffel Tower: वरुण धवन आणि जान्हवी कपूरच्या 'बवाल'चा आयफेल टॉवरवर होणार प्रीमियर

ABOUT THE AUTHOR

...view details