मुंबई :बिग बॉस ओटीटी २ हा शो दिवसेंदिवस वादग्रस्त होत आहे. शोमधून आधी चार स्पर्धक घर सोडून गेले आहे. दरम्यान आता परदेशी स्पर्धक जैद हदीदने शो सोडण्याची धमकी दिली आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये आकांक्षा पुरीसोबत लिप लॉक केल्यानंतर जैद हदीद प्रसिद्धीझोतात आला. या चुंबनानंतर सलमान खानने आकांक्षा पुरीला शोमधून काढून टाकले. तसेच गेल्या एपिसोडमध्ये जैद हदीद हा बेबी ध्रुववर थुंकला होता. जैद त्यावेळी फार रागात होता. या घटनेनंतर जैद हदीदने सलमान खानची हात जोडून माफीही मागितली होती. पण आता नुकतेच त्याने घर सोडण्यातची धमकी दिली. त्यानंतर तो आपले सामान पॅक करायला लागला.
टॉर्चर टास्क :घराच्या कॅप्टन जिया शंकरसाठी टॉर्चर टास्क दरम्यान, बाबिका आणि जैद समोरासमोर आले होते. टॉर्चर टास्कमध्ये मर्यादा ओलांडल्याबद्दल बाबिकाने जैदला खूप जास्त फटकारले होते आणि दुसरीकडे जैदला बबिकाचा फार राग आला होता. त्यानंतर तिला उत्तर देताना तो थुंकला. बबिकाने जैदचे पूर्ण वैयक्तिक आयुष्य घरातच उखडून काढले, यादरम्यान जैद नाराज झाला आणि त्याला रडू आले. बाबिकाने सांगितले की, जैदची पहिली पत्नी चांगली होती, पण जैदला अशा जोडीदाराची गरज होती जी प्रत्येक गोष्टीत त्याला होकार देईल.