महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

BIGG BOSS OTT 2 : सलमान खानच्या बिग बॉस ओटीटी 2 शोवर युजर भडकले - जैद हदीद

सलमान खानचा शो बिग बॉस ओटीटी 2 पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या शोमधील एका प्रोमोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातले आहे. जाणून घ्या प्रोमोत काय होते तर...

BIGG BOSS OTT 2
बिग बॉस ओटीटी 2

By

Published : Jun 30, 2023, 3:45 PM IST

मुंबई :सलमान खानचा शो बिग बॉस ओटीटी 2 आता आपल्या रंगात येत आहे. या शोने 13व्या दिवसात प्रवेश केला आहे. नुकताच 13व्या दिवसाचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातले आहे. जिओ सिनेमावर प्रदर्शित होत असलेल्या शोच्या प्रोमोमध्ये, घरातील दोन स्पर्धक, जैद हदीद-आकांक्षा पुरी यांनी या शो दरम्यान असे काही केले आहे की ज्यामुळे सध्याला त्यांची चर्चा होत आहे . प्रोमोमध्ये असे दिसते आहे की जैद हदीद-आकांक्षा पुरी 30 सेकंदांसाठी लिप किस करत आहे. (एकमेकांच्या ओठांवर चुंबन घेत आहेत). आता शोच्या प्रोमोमधून आलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा पसरला आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर आता यूजर्स सलमान खानवर जोरदार टीका करत आहे.

बिग बॉसच्या घरात सर्व मर्यादा ओलांडल्या : आकांक्षा पुरी आणि जैद हदीद गेल्या एपिसोडपासून चर्चेत होते कारण जैदने तिला अयोग्यरित्या स्पर्श करत होता. सोशल मीडियावर युजर्सनी मॉडेल जैदला हरमध्ये राहण्याची सूचना केली होती आणि आता आकांक्षासोबत जैदचा लिपलॉकचा सीन समोर आला तेव्हा सर्वांच युजरचे रक्त खवळले आहे. आता या दोघांची मैत्री फार घट्ट होत आहे. दरम्यान अविनाश सचदेवने जैद आणि आकांक्षा यांना घरात एक चॅलेंज दिले होते त्यानंतर या दोघांनीही ते आव्हान स्वीकारले होते. या चॅलेंजमध्ये दोघांनी घरात लावलेल्या 150 कॅमेऱ्यांसमोर एकमेकांना लिप किस करायचे असे सांगण्यात आले होते.

लिपलॉकवर लोकांचा रोष उफाळून आला :एका यूजरने कमेंट करत लिहिले आहे की, 'जिथे आकांक्षाला जैदला स्पर्श करतानाही त्रास होत होता आणि आता ती किस करून शकते'. आणखी एका यूजरने लिहिले की, 'हे खूप घाणेरडे आहे, सलमान खान नक्कीच या लोकांचा क्लास घेईल'. आणखी एक यूजर लिहिले की, 'मेकर्स आता त्यांच्या शोचा टीआरपी वाढवण्यासाठी इतक्या प्रमाणात झुकले आहेत'.

सलमान खानचे वचन मोडले : पहिल्यांदाच बिग बॉसच्या ओटीटी व्हर्जनचे होस्ट करत असलेल्या सलमानने प्रेक्षकांना आधीच वचन दिले होते की, घरात कोणतीही अश्लीलता होणार नाही, सलमान खान म्हणाला होता की, सेन्सॉरची कात्री चावलत असेल तरी यावेळी त्यांची कात्री चालणार नाही. ओटीटीवर, पण तो शोमध्ये सभ्यता राखेल. आता या संपूर्ण घटनेवर सलमान खान काय भूमिका घेतो हे पाहावे लागेल

हेही वाचा :

  1. Lust Stories 2 : लस्ट स्टोरीज 2 स्टार तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी शेअर केला त्यांच्या डेटिंग अनुभवाबद्दलचाा खुलासा
  2. ADIPURUSH BOX OFFICE COLLECTION : आदिपुरुष या चित्रपटाची कमाई धोक्यात
  3. Ranbir Alia return Mumbai : दुबईच्या सुट्टीवरून मुंबईला परतले रणबीर कपूर आणि आलिया भट्ट, पहा त्यांची झलक

ABOUT THE AUTHOR

...view details