मुंबई: बॉलिवूड स्टार सलमान खानचा शो 'बिग बॉस ओटीटी २' आता फार जास्त चर्चेत आहे. अलीकडेच आकांक्षा पुरी आणि जैद हदीद यांच्या ३० सेकंदांच्या लिपलॉकने घरात खळबळ उडवून दिली आहे. घरात असे कृत्य केल्याबद्दल सलमानला राग आला होता. त्यामुळे आकांक्षा पुरीला घरातून बाहेर काढण्यात आले. इकडे या आठवड्यात जैदच्या डोक्यावरही निर्मूलनाची टांगती तलवार उभी आहे. आता घरात आणखी एक नवा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, या शोमध्ये कमीतकमी कपडे परिधान करणारी उर्फी जावेदने मनीषा राणीला निशाण्यावर धरले आहे. 'बिग बॉस ओटीटी २'मध्ये उपस्थित स्पर्धकांवर कमेंट केल्यामुळे उर्फी सध्याला चर्चेत येत आहे.
अब्दू रोजिकची शोमध्ये एंट्री? : बिग बॉसचे माजी स्पर्धक अब्दू रोजिक यांनी घरात खास पाहुणे म्हणून एंन्ट्री घेतली आणि त्यांनी एका टास्कमध्ये देखील सहभाग घेतला. अब्दू रोजिकची शोमध्ये एंट्री झाल्यानंतर मनीषा राणी अधिकच उत्साहित झाली आहे आणि तिने घरात अब्दूला 'जबरदस्तीने किस' केले. यावर उर्फी जावेद संतापली. मनीषाने एका टास्कदरम्यान हे कृत्य केले, ज्यावर सोशल मीडियावरही लोक तिच्यावर भडकले आहे. या चुंबन दृश्याचा स्क्रीनशॉट शेअर करत उर्फीने लिहिले आहे की, 'हे पाहणे खूप अस्वस्थ करणारे आहे, ती जबरदस्तीने त्याचे चुंबन का घेतेय, तो छोटा मुलगा नाही, मर्यादेत राहा'. असे लिहले आहे.