मुंबई : 'बिग बॉस ओटीटी २' शो प्रेक्षकांचा खूप पसंतीचा शो आहे. या शोमध्ये रोज मनोरंजक गोष्टी घडत असतात, सोमवारचा बिग बॉसचा ३८वा भाग हा खूप मनोरंजक होता. या भागात अनपेक्षित गोष्टी घडल्या, त्यामुळे प्रेक्षकांचे खूप मनोरंजन झाले. धमाकेदार वीकेंडच्या वॉर नंतर सोमवारी 'बिग बॉस ओटीटी २' मध्ये एंजेल आणि डेविल हे टाक्स घेण्यात आले होते. या टास्कमध्ये घरातील सदस्यांचे दोन विभाग करण्यात आले होते. या सगळ्यामध्ये कुटुंबातील सदस्यांची आपसी भांडणेही समोर आली. तसेच बिग बॉसच्या घरात आत मनीषा राणीशी संबंधित एक क्षण सर्वांनाच भावूक करून गेला.
डेव्हिल्स विरूद्ध एंजल्स टास्क : बिग बॉसने डेव्हिल्स विरुद्ध एंजल्स टास्क घरात सुरू केले, ज्यामध्ये बिग बॉसने अभिषेकला टीम एंजल्सचे नेतृत्व करायला लावले आणि एल्विशला टीम डेव्हिलचे नेतृत्व करायला लावले. टास्क दरम्यान, टीम एंजेलला काही बंधने पाळावी लागली. एंजेल टीमला मोठ्याने बोलण्याची परवानगी या टास्कमध्ये नव्हती. तसेच त्यांना नेहमीच डेव्हिल टिम सदस्यांसोबत आदराने बोलवे लागेल याशिवाय त्यांना या टास्कमध्ये रडण्याची परवानगी नाही आणि साधे अन्न खाणे त्यांच्यासाठी आवश्यक राहणार असे या टास्कमध्ये सांगण्यात आले होते. बिग बॉसच्या डेव्हिल विरुद्ध एंजल्स या टास्कमध्ये अनपेक्षित घडले. यावेळी काही घरातील सदस्यांमध्ये भांडणे झाली तर याशिवाय यादरम्यान मनीषा आणि बबिकामध्ये जोरदार भांडणे झाली.