मुंबई :बिग बॉस ओटीटी सीझन २च्या ३०व्या दिवसाचे होस्टिंग करण्यासाठी सलमान खान हजर नव्हता. त्याच्या ऐवजी कॉमेडियन भारती सिंग आणि कृष्णा अभिषेक यांनी सूत्रसंचालन केले. बिग बॉस ओटीटी सीझन २च्या ३०व्या भागाच्या सुरुवातीला भारती आणि कृष्णाचे मनोरंजक भांडणे प्रेक्षकांसाठी मनोरंजक होती. या वीकेंडच्या वॉरमध्ये एकाही स्पर्धकाची हकालपट्टी घरातून झाली नाही. या भागात खूप धमाल करण्यात आली. तसेच बिग बॉसच्या घरात यावेळी सदस्यांमध्ये शाब्दिक मारामारी झाली.
भारती सिंग-कृष्णा अभिषेक यांनी मजेदार कार्ये केले सादर : सलमान खानच्या अनुपस्थितीत, भारती आणि कृष्णाने चौथ्या वीकेंड का वॉरमध्ये प्रेक्षकांचे खूपच मनोरंजन केले. या भागात एल्विश यादव आणि आशिका भाटिया यांना आमंत्रित केले होते. त्यानंतर या दोघांनी या भागात बरेच धक्कादायक खुलासे केले. आशिकाने एल्विशवर खूप आरोप करत त्याला दोष दिला. याशिवाय या भागात स्पर्धकामध्ये वाददेखील पेटला होता.
एल्विश यादवची कॅप्टन म्हणून निवड करण्यात आली :स्पर्धकांना त्यांचे वैयक्तिक सहाय्यक म्हणून आशिका आणि एल्विश यापैकी एक निवडण्यास सांगण्यात आले होते. यावेळी एल्विशला अधिक मते मिळाली. त्याला स्पर्धकांचे वैयक्तिक सहाय्यक तसेच घराचा कॅप्टन म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते. एल्विशला घरातील सदस्य कोणतेही वैयक्तिक काम सोपवू शकतात, असे यावेळी सांगण्यात आले होते.