मुंबई : बिग बॉस ओटीटी २ हा शो आता फार जबदस्त मार्गावर आला आहे. आता बिग बॉसच्या घरात स्पर्धक भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक कार्यासाठी सज्ज झाले असताना २५व्या भागामध्ये नॉमिनेशन घेण्यात आले. बिग बॉसने दिलेल्या टास्कमुळे प्रेक्षक पूर्णपणे गुंतवून गेले, कारण एक नवीन नॉमिनेशन टास्क घडला ज्यामध्ये स्पर्धकांना नॉमिनेट करण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक वस्तूंचा त्याग करण्यास सांगितले होते जिया शंकर आणि अभिषेक मल्हान या टास्कचे निरीक्षण करत होते.
अविनाश सचदेवने केला ब्रेसलेटचा त्याग : घरातील कॅप्टन असल्याने जिया शंकर ही नॉमिनेशनमधून वाचली. तसेच दुसरीकडे, प्रेक्षकांनी दिलेल्या मतदानमुळे अभिषेक मल्हान हा देखील वाचला होता. त्यानंतर अभिनेता अविनाश सचदेवने त्याच्या ब्रेसलेटचा त्याग केला आणि पूजा भट्टला शोमध्ये चुकीचे लोकांचे समर्थन करते आणि बेबीका धुर्वेला प्रेरित करते असे कारण देत नॉमिनेट केले.
पुजाने का कशाबद्दल केला आरोप :यादरम्यान, अभिषेक मल्हान हा अविनाश सचदेवच्या दाव्यांचे समर्थन करताना दिसला. त्यानंतर अभिषेकने पूजा भट्टला चिडवले. याशिवाय पूजा भट्टने अभिषेकवर बाबिका धुर्वेवर बॉडी शेमिंग केल्याबद्दलचा आरोप देखील यावेळी केला होता. तसेच बाबिका ही तुन करून पुजाला बोलयला लागली. त्यानंतर पूजा भट्ट म्हटले, मला तुन हा शब्द खटकतो कारण मी ज्या जगात राहते तिथे तुन करून बोलत नाही. पुढे तिने म्हटले, पण मी ते सोडले कारण मला वाटते की येथे खरोखर काही समस्या आहे, मी ज्या संस्कृतीतून आले आहे त्या संस्कृतीत लोकांना तुन तुन म्हटलेले आवडत नाही'
अविनाश सचदेव आणि जिया शंकर यांनी मतभेद सोडवले: नॉमिनेशन कार्यानंतर, जिया आणि अविनाश यांनी त्यांच्यातील मतभेद दूर करण्याच्या प्रयत्न केला. त्यानंतर जिया सांगितले की फलक नाझवर तिचे प्रेम आहे आणि ती एक चांगली मित्र आहे. तसेच अविनाश जियाला खात्री देतो की त्याला कशाचाही राग आलेला नाही आणि तो सर्वांचा आदर करतो. जिया यावेळी कबूल करते अविनाशचा गैरसमज झाला यावर ती खेद व्यक्त करते.
हेही वाचा :
- Satyaprem Ki Katha box office collection: 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाने १३व्या दिवशी केली 'इतकी' कमाई...
- Mouni Roy : मौनी रॉय मुंबई विमानतळावर एंट्री गेटवर गोंधळली...
- Jawan Prevue : शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाच्या प्रीव्ह्यूवर सलमान खानने दिली प्रतिक्रिया...