मुंबई - Bigg Boss 17 :देशभरात करवा चौथचा सण 1 नोव्हेंबर रोजी देशभरात साजरा करण्यात आला. या सणाच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीसाठी उपवास करतात आणि चंद्राकडे पाहून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. दरम्यान 'बिग बॉस 17' मध्येही करवा चौथचा सण साजरा करण्यात आला. अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि ऐश्वर्या शर्मा यांनी बिग बॉसच्या घरातच आपापल्या पतीसाठी उपवास ठेवला आणि चंद्र पाहून उपवास सोडला. त्यांचे आता व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अंकिता लोखंडेनं तिचा नवरा विकी जैनसाठी करवा चौथ उपवास केला, त्या दरम्यान तिनं लाल रंगाची साडी नेसली होती आणि विकी जैनने गडद हिरव्या रंगाची शेरवानी घातली होती. लाल साडीत अंकिता खूपच छान दिसत होती. या जोडप्यानं बिग बॉसच्या घरात करवा चौथचा सण साजरा केला
ऐश्वर्या शर्मानं बिग बॉस 17 मध्ये करवा चौथचा सण केला साजरा : ऐश्वर्यानं या खास प्रसंगी वाइन कलरची साडी परिधान केली होती, तर नील भट्टनं ऑफ- वाईट कलरचा कुर्ता पायजामा घातला होता. यावेळी हे जोडपे खूप खास दिसत होतं. ऐश्वर्यानं करवा चौथचा उपवास विधीपूर्वक पाळला. या टीव्ही कपलची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे. 'गम है किसी के प्यार में' या मालिकेमध्ये ऐश्वर्या ही नीलच्या वहिनीच्या भूमिकेत दिसली होती. ऐश्वर्याच्या आयुष्यात येणारा हा नील पहिलाच व्यक्ती नव्हता. यापूर्वी तिची पहिल्या प्रेमात फसवणूक झाली. त्यानंतर तिला कधीच लग्न करायचे नव्हतं. जेव्हा नील तिच्या आयुष्यात आला, तेव्हा ऐश्वर्याचा लग्नाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. त्यानंतर या जोडप्यानं 30 नोव्हेंबर 2021 रोजी लग्न केले.